महापालिकेच्या महापौर पदाची उत्सुकता अखेर आज संपली. भाजपाने एकसंघ राहत भाजपच्या सर्व 50 नगरसेवकांनी प्रदीप कर्पे यांच्या पाठीशी राहून त्यांना बहुमताने महापौरपदी विराजमान केले. यामुळे भाजपचे नगरसेवक फुटणार, महाविकास आघाडी जळगावप्रमाणे चमत्कार घडवणार, यासर्व केवळ वावड्याच ठरल्या. भाजपात एकजुट तर उलट हाविकास आघाडीत फाटाफुट दिसून आली आहे. दरम्यान विरोधी उमदेवार अन्सारी सईदा म. इकबाल यांना 4 तर पिंजारी मदिना समशेर यांना 17 मते मिळाली. तर शिवसेना आणि बहुजन समाज पक्ष तटस्थ राहिला.