शहरातील साक्री रोडवरील वसाहतींमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. याच रोडवरील वैद्य नगरात सात वर्षाच्या बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. परंतू महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. वसाहतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून फवारणी, धुरळणी व अॅबेटींग झालेली नाही.