नागपूर-सूरत बायपासवरुन होणारी गांजाची तस्करी धुळे शहर पोलिसांनी रोखली. या ठिकाणाहून स्वीफ्ट डिझायर वाहनाच्या डिक्कीतून 18.674 किलो ग्रॅम गांजा 93 हजार 370 रुपये किंमतीचा आणि वाहन असा पाच लाख 93 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.