येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी आज मुलाखती घेण्यात येणार होत्या. परंतू गुणवत्ता यादी कोणत्या निकषानुसार तयार करण्यात आली याबाबत काही उमेदवारांनी हरकत घेतल्याने तसेच पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात आल्याने तांत्रिक कारण दाखवून सदर मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.