मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या जुने बी. जे. मार्केटमध्ये गाळे सील करण्याच्या कारवाईसाठी महापालिकेचे उपायुक्त गेले असता कारवाई करताना गाळेधारकांनी विरोध केल्यामुळे मनपा अधिकारी आणि गाळेधारकांमध्ये वाद झाला. अखेर एका गाळेधारकाने तत्काळ दोन लाखांचा धनादेश दिल्यामुळे महापालिकेचे पथक कारवाई न करता परतले.