शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी संस्थांतर्फे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. दरम्यान, विविध संस्थांनी यानिमित्ताने सामाजिक उपक्रम राबवून लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांचे स्मरण केले.