राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबत टीका टिपण्णी करणार नाही. परंतु, भाजप सोडून गेलेल्यांची दुर्गतीच झाली असा अप्रत्यक्ष टोला भाजपचे नेते आ. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत लगावला. दरम्यान, जो चोरी करतो, त्याच्या मागे ईडी लागते असे विधानही त्यांनी यावेळी केले.