जिल्हा परिषदेच्या विविध विभागात सेवा बजावून निवृत्त झालेल्या कर्मचार्यांना शासन आदेशान्वये 1 ते 5 तारखेपर्यंत पेन्शन मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यांना हक्काच्या पेन्शनसाठी नेहमीच वाट पाहावी लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. पेन्शनधारकांची होणारी ससेहोलपट नूतन सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी थांबवावी, अशी मागणी होत आहे.