शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी सुखलाल लक्ष्मण घोडके यांनी 19 जानेवारी रोजी गळफास घेवून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी सुखलाल घोडके यांनी लिहलेली चिठ्ठी तब्बल आठ महिन्यानंतर कुटुंबियांच्या हाती लागली आहे. त्यावरुन 7 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिसात दलाल प्रकाश सुपडू माळी, शेतजमीन खरेदी करणारे शैलेंद्र वसंत चिरमाडे या दोन जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संशयित प्रकाश माळी यास पोलिसांनी अटक केली असून चिरमाडे हा फरार आहे.