महापालिका प्रशासनाकडून वारंवार थकबाकीच्या नोटीस बजाविल्या जात आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कुटुंबासह गाळेधारक मानसिक तणावात आहेत. दरम्यान, गाळ्यांना सील लावण्याच्या कारवाईमुळे संपूर्ण कुटुंबाला विष पाजून स्वतःदेखील जीवन संपविणार असल्याचा इशारा गाळेधारकांनी पत्रकार परिषदेत दिला.