नंदुरबार शहरातील लॉ कॉलेज परिसरात संतोष सुरेश कदम रा.संजयनगर (नंदुरबार) हा एक तलवार बाळगतांना मिळून आला. याबाबत पोशि हेमंत बारी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष सुरेश कदम याच्याविरूध्द भारतीय हत्यार कायदा कलम 4 चे उल्लंघन 25सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 37 (1), (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ रविंद्र पवार करीत आहेत.