कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र, निर्बंधातही नियमांचे उल्लंघन करणार्यांवर मनपा प्रशासनाकडून कारवाईची मोहीम सुरु आहे. शुक्रवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निर्मुलन पथकाने रेल्वे स्टेशन परिसरातील बॉम्बे हॉटेलसह सात दुकानांना ‘सील’ ठोकले आहे. तसेच जुन्या साने गुरुजी रुग्णालयाच्या जागेवर ठेवण्यात आलेले हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.