येथील धुळे रस्त्यावरील अहिंसा पॉलिटेक्निक कॉलेजजवळ असलेल्या इंडियन गॅसचे गोडावून फोडून चोरट्यांनी तब्बल गॅस भरलेले 537 सिलींडर व 22 गॅस शेगडी असा एकुण एकूण 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.