तब्बल आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांची घंटा दि. २३ नोव्हेंबरपासून वाजणार आहे. शाळा सुरू करण्यासाठीची संपुर्ण तयारी शाळा व्यवस्थापनाने केली आहे. दरम्यान, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली असली तरी अद्याप बर्याच शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले नसल्याने तसेच बर्याच शिक्षकांचा अहवाल पॉझीटिव्ह आल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही याबाबत शिक्षकांसह विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत.