नंदुरबार नगरपालिकेने विरोधकांच्या मागणीवरुन सहा महिन्यांची घरपट्टी माफ केली, असा फलक लावून विरोधकांनी जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात नगरपरिषदेला घरपट्टी माफ करण्याचे अधिकारच नाहीत. त्यामुळे हे फलक त्वरीत काढून हटवावेत, अन्यथा संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी दिला आहे