चेन्नईच्या संघाने आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या डावाची सुरुवात यावेळी चांगली झाली नाही. कारण पहिल्याच षटकात चेन्नईचा सलामीवीर सॅम करन बाद झाला, त्याला भोपळाही फोडता आला नाही. पण त्यानंतर शेन वॉटसन आणि ड्यूप्लेसिस यांनी चेन्नईच्या डावाला चांगला आकार दिला. या दोघांनी यावेळी दुसर्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी रचली. ही जोडी दिल्लीचा वेगवान गोलंदाज नॉर्कियाने फोडली.