आपण शेवटचं कधी खरंच बोर झालो होतो?
मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं, Reels नव्हते... तेव्हा बोर व्हायचो. आणि त्या बोर होण्यातूनच काहीतरी करायचो — मित्रांना भेटायचो, पुस्तक वाचायचो, लिहायचो, भटकायचो, गप्पा मारायचो... कधी काहीही!
आज आपण सतत connected आहोत, पण कदाचित आपल्या स्वतःपासून आणि आपल्या माणसांपासून थोडे disconnected झालोय.
या गप्पांमध्ये थोडी त्या जुन्या बोर होण्याची मजा, थोडं आजच्या मोबाईलच्या जगाचं निरीक्षण आणि एक छोटासा आग्रह —
कधीतरी बोर व्हा की…
कदाचित त्या बोर होण्यातूनच काहीतरी सुंदर सापडेल.
मुलांनाही थोडं बोर होऊ द्या. कारण कंटाळा आला कीच कल्पनाशक्तीला काम मिळतं.
आणि पुढच्या वेळी बोर झालात तर Reels उघडण्याआधी एकदा बाहेर पडा.
भाजी मंडईत जा, मित्राला भेटा, एखादी तर्रीवाली मिसळ खा... किंवा उगाचच फिरून या.
कारण कधी कधी...
बोर होणं हीसुद्धा एक गरज असते.