रस्त्याच्या बाजूला तंबू ठोकून काहीबाही औषधे विकणाऱ्या भोंदूला डॉक्टर म्हणणे म्हणजे तद्दन मूर्खपणाच नाही का? भले त्याने डॉक्टर बावडेकर, सेक्स स्पेशालिस्ट असा खडूने आपल्याच हाताने लिहिलेला बोर्ड लावून गळ्यात स्टेथोस्कोप अडकवला असला तरी ज्याला थोडीफार अक्कल आहे असा मनुष्य उपचारासाठी कधीही त्याच्याकडे जाणार नाही. त्याचप्रमाणे पत्रकारिता हा अभ्यास, व्यासंग आणि बुद्धीचा व्यवसाय आहे. पत्रकार असणे एक अत्यंत जवाबदारीची आणि तितक्याच प्रतिष्ठेची गोष्ट आहे. दुर्दैवाने आज त्यातही अनेक कुडमुडे घुसलेले आहेत. त्यांना न्यूजडे हेच नाव सार्थक आहे.