लेक लाडकी

लेक लाडकी

By महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजनाGovernmentKids & Family
Download on the App Store

लेक लाडकी episodes

  • उज्ज्वल भविष्याची पणती

    एका आजीला स्वतःच्या बालपणातले दिवस आठवतात, जेव्हा घरी महिलेच्या नशिबी चूल आणि मूल हेच काम असायचे. तिच्याशी नशिबी असेच भोग आले. आता जेव्हा त्यांची सून आई होणार असते, तेव्हा तिला मुलगी तर होणार नाही ना आणि झाली तर कसं होणार अशा चिंतेने आजीबाई त्रस्त असतात. अशा वेळी एक अंगणवाडी ताई त्यांना भेटते आणि त्यांच्या संवादातून आजीपुढील चिंतेचे मळभ निघून जाते आणि नवी आशा पल्लवित होते. लेक लाडकी योजनेचा सांगावा आजीला नवी उमेद मिळवून देतो. संवेदनशील आजीला विचारांची नवी दिशाही मिळून जाते. समाजातील अशा अनेक आजींचे प्रतिनिधित्व करणारी ही गोष्ट, लेक लाडकी योजनेचं वेगळेपण अधोरेखित करुन जाते. 

    19 min
  • निरागस चेहऱ्यावरचं हसू

    दूर डोंगरकपारीत छोट्याशा वाडीत भटक्या कुटुंबात राहणाऱ्या छोट्याशा रेखाला अंगणवाडीची ताई भेटली आणि त्यातून त्या कुटुंबालाच जणू जगण्याची नवी दिशा गवसली. त्या ताईने मग तिथल्या सर्वांना `लेक लाडकी योजना` समजावून सांगितली आणि वाडीवरच्या मुला-मुलींच्या निरागस चेहऱ्यावर हसू उमटलं. 

    18 min
  • सकारात्मक भविष्याची हमी

    अत्यंत कठीण परिस्थितीशी झुंजत नैना मोठी झाली. हुशार असली तरी शिक्षण अर्धवट सोडावं लागली. मोलमजुरी करीत, आपल्या दिव्यांग भावाचा, वृद्ध वडिलांचा सांभाळ करीत होती. लग्न झालं पण सासरी वागणूक चांगली मिळत नव्हती. त्यातच त्यांना वंशाचा दिवा हवा होता. पण मुलगी झाली अन् तिला कायमची माहेरी यावं लागलं. अशा भयानक परिस्थितीत तिच्यापर्यंत पोहोचली, लेक लाडकी योजना. त्यामुळे, तिच्या आयुष्याला सकारात्मक भविष्याची जणू हमीच मिळाली. समाजातील अशा हजारो नैनांना या योजनेतून मानसिक, आर्थिक आणि नैतिक धीर लाभला आहे. 

    19 min
  • लेकींनो, स्वागत आहे तुमचं!

    झोपडपट्टीत राहणाऱ्या किंवा गरीबांच्या घरी मुलींनी जन्म घेणं हे आजही घोर अपराध घडल्यासारखं अनेकांना वाटतं. असाच अनुभव घेणाऱ्या वस्तीतील महिलांना यांना एक दिवस `लेक लाडकी` योजना समजली आणि त्यांच्या विचारांत सकारात्मक आणि आनंदी भावनेने पदार्पण केले. मुलींचा जन्म नकोसा वाटणाऱ्यांना आता त्यांचं स्वागत करावंसं वाटू लागलं...त्याचंच एक प्रातिनिधिक चित्र. 

    21 min
  • महिला सशक्तीकरणाची गुरुकिल्ली

    आपल्या आयुष्यात अत्यंत हालअपेष्टा सहन करुनही रिंकू न डगमगता आयुष्यात संघर्ष करीत होती. सामाजिक संस्थांच्या जगात तिनं पाऊल टाकलं आणि समाजापुढील खऱ्या प्रश्नांची जाणीव तिला झाली. मग तिनं अशाच गरजू मुली, स्त्रियांसाठी काम करण्यास सुरवात केली. लेक लाडकी सारखी योजना येताच तिला लक्षात आलं, की हीच तर गुरुकिल्ली आहे, आपल्याला समाजाला खरा संदेश देणारी. रिंकूसारख्या अनेक समाजसेविकांना लेक लाडकी योजना त्यामुळेच तर मनापासून आवडतेय आणि ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या प्रयत्न करताहेत. 

    19 min
  • स्वप्नांचे नवे क्षितिज

    सरकारी योजनांविषयी शहरातील तरुणाई काय विचार करीत असेल आणि अशा योजनांचा खरा लाभ ज्यांपर्यंत पोहोचतोय अशांशी त्यांचा संवाद झाला तर ते चित्र कसे असेल....मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या शर्मिलाने `लेक लाडकी` योजनेबाबत आपला अनुभव सांगत तरुण मुलामुलींना नवी दृष्टी दिली, त्याची ही गोष्ट. अशा अनेक शर्मिलांचं आयुष्य `लेक लाडकी` योजनेमुळे स्वप्नांचं नवं क्षितिज पाहायला शिकतंय. 

    17 min
  • उज्ज्वल पहाट

    महानगरी मुंबईतील धारावीत वास्तव्य करणाऱ्या हजारो कष्टकरी महिलांपैकी एक म्हणजे आयशा. चहाचा स्टॉल लावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या आयशाच्या आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाबद्दल, नूरबद्दल अत्यंत चिंता होती. तेव्हाच, तिच्या संपर्कात आलेल्या मीराने असं काही सांगितलं जे ऐकून अन् अनुभववून आयशाला जणू नवी पहाट झाल्याचा भास झाला...लेक लाडकी योजना ही अशाच असंख्य आयशांच्या आयुष्यात उज्ज्वल पहाटेचा सांगावा घेऊन आली आहे. 

    20 min
  • गूड न्यूज

    समाजातील गरजू लोकांसाठी काही करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या दौलत आणि रेणूची ही गोष्ट. इतरांसाठी अडीअडचणीला धाऊन जाणारे हे दाम्पत्य मुलीच्या जन्माविषयी असा कोणता सकारात्मक विचार करते, जे ऐकून आपणास असे दौलत अन् रेणू आपल्याही आसपास हवेत, असे वाटायला होतं...`लेक लाडकी` योजनेच्या निमित्ताने समाजात सापडणाऱ्या अशा सकारात्मक व प्रागतिक विचारांच्या तरुणाईचेही स्वागतच व्हायला हवे. 

    19 min
  • लाडक्या लेकी

    मुलगी असणं म्हणजे ओझं अशी भावना अनेकांमध्ये असते. बांधकामावर मजुरीचे काम करणाऱ्या एकाला असेच वाटायचे. मुलगी नकोच असं त्याला वाटत असताना पत्नीने त्याला खंबीरपणे विचार करायला शिकवले आणि लेक लाडकी सारखी योजना पुढे येताच त्याच्या विचारात परिवर्तन झाले... हातावर पोट असणाऱ्या समाजातील असंख्य परिवारांचं प्रतिनिधित्व करणारे हे उदाहरण `लेक लाडकी` सारखी योजना त्यांच्या आयुष्यात काय सकारात्मक संदेश घेऊन येतेय, हेच दाखवते. 

    21 min
  • लेक लाडकी...सर्व घरांची!

    `मुलगी म्हणजे डोक्यावरचे ओझे` असा समज असणाऱ्या आपल्या समाजातील एक प्रतिनिधी म्हणजे बकुळाबाई. तिच्या मनातील चिंता दूर करणारी योजना म्हणजे लेक लाडकी...कसे ते ऐका, या गोष्टीत. 

    21 min

About लेक लाडकी

From the publisher's feed

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत, लेक लाडकी ही अभिनव योजना राबविण्यात येते. ही योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही पॉडकास्ट मालिका तयार…