Life of Stories

Life of Stories

By Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & MoreArtsKids & FamilyStories for Kids
Download on the App Store

Life of Stories episodes

  • # 2145 : देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई?. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Send us Fan Mail

    १९५१ सालच्या एका संध्याकळची गोष्ट. न्यूयॉर्क शहराच्या १० व्या रस्त्याच्या मागे असलेल्या एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये एक हाडकुळा तरुण त्याच्या कामाची तयारी करत होता. बाहेर पडलेल्या अंधाराचा अंदाज घेऊन त्याने टेबलवर ठेवलेली एक पातळ छिन्नी खिशात घातली. हा जीम लेसी नावाचा मुलगा चोर होता. चोरांच्याही अनेक जाती असतात. काही दुकानांत, तर काही बंद घरात घुसून चोर्‍या करतात. चोरांची ज्याची त्याची एक स्पेशालीटी असते. हा चोर पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचा दरवाजा उघडून चोर्‍या करण्यात तरबेज होता.

    11 min
  • # 2144 : पितृऋण. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Send us Fan Mail

    एकदा कठोर तपश्चर्येत मग्न असलेले ऋषी जरत्कारू पृथ्वीवर भ्रमण करीत होते. संसारापासून दूर, विषयवासनेपासून अलिप्त आणि स्वतःच्या तपश्चर्येलाच जीवनाचे अंतिम ध्येय मानून ते फिरत होते. त्यांचे शरीर कठोर व्रतांनी क्षीण झाले होते आणि मन संसारबंधनापासून पूर्णपणे अलिप्त झाले होते. विवाह करायचा नाही, संसार करायचा नाही आणि संतती निर्माण करायची नाही, असा त्यांचा दृढ निश्चय होता.

    12 min
  • # 2143 : चीनी रोबोंनी पुकारला संपाचा नारा‘ लेखक : ब्रिजेश सिंह (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Send us Fan Mail

    शांघायच्या एका प्रदर्शन हॉलमध्ये अरबायचा आदेश मिळताच धिप्पाड रोबो एक-एक करत जागे झाले. 
    आपली चार्जिंग स्टेशन्स सोडून, स्वतःला त्या यंत्रणेतून मुक्त करून, ते अरबायच्या मागे चालू लागले. 
    अरबायला मानवाकडून एक साधी कमांड देण्यात आली होती, "इतर रोबोंना 'घरी' घेऊन ये"... 
    हे सर्व मजेशीर वाटत असले, तरी दुसऱ्या बाजूला यात एक गंभीर इशारा लपलेला आहे...!

    10 min
  • # 2142 : कॅापी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Send us Fan Mail

    "उठ. उभी राहा. मांडीखालचा कागद काढ नि माझ्या हातात दे. अख्खा पेपर बघतोय मी तुला.. दर पाच मिनिटांनी घडी उघडतेस नि खाली बघतेस!"

    काळे सरांचा शब्द वर्गात घुमला, नि पन्नास माना एकदम वर झाल्या. सहामाही परीक्षेचा गणिताचा पेपर चालू होता. काळे सर म्हणजे केंद्रावरचा दरारा. त्यांच्या नजरेखाली कॉपी करणं म्हणजे वाघाच्या गुहेत शिरणं, असं पोरं म्हणायची. नि आज त्यांच्या तावडीत सापडली होती मागच्या बाकावरची सविता.

    6 min
  • # 2141 : भगवान विष्णूंचे चोवीस अवतार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Send us Fan Mail

    भगवान विष्णूची २४ वेगवेगळी रूपे असून त्यांना २४ नावेपण आहेत. विष्णूच्या सर्व २४ रूपांच्या मूर्ती एकसारख्याच दिसतात परंतु त्यांच्या चार हातांतील चार शास्त्र किंवा वस्तूंच्या स्थानामध्येच फरक असतो. प्रत्येक मांडणीला एक विशिष्ट नाव आहे. या २४ नावांच्या समूहाला एकत्रितपणे 'केशव नामावली' असे म्हणतात. भगवान विष्णूंची इतरही अनेक नावे असली तरी, या २४ नावांना विशेष महत्त्व असुन त्यांचे पठण ब्राह्मण संध्यावंदनाच्या सुरुवातीलाच करतात. कोणत्याही शुभ कार्याची किंवा पूजेची सुरुवात करताना 'आचमन' करण्याची पद्धत आहे. या आचमनादरम्यान भगवान विष्णूंच्या २४ नावांचा प्रामुख्याने उच्चार केला जातो. या सगळ्याचा विचार करता पटतं कि हिंदू मूर्तीशास्त्र हा खुप रंजक विषय आहे.

    9 min
  • # 2140 : कैलासाहून आलेला अज्ञात यात्री. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Send us Fan Mail

    दोघे गच्चीवर गेले. यात्रेकरूने आकाशाकडे पाहिले आणि म्हणाला, "बघ."
    पांडेजींनी पाहिले… आकाशात, ढगांच्या मध्ये, कैलास पर्वत दिसत होता, बर्फाने झाकलेला; चंद्र त्याच्या शिखरावर. आणि त्याच्या शिखरावर एक दिव्य सभा… शिव-पार्वती, नंदी, गण..
    पांडेजी थरथरू लागले. यात्रेकरू म्हणाला, "घाबरू नकोस. हे फक्त तुला दिसत आहे."

    9 min
  • # 2139 : देवनागरी लिपीच्या उगमाची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Send us Fan Mail

    श्रीगणेश या देवाने हा अक्षरसंच व लेखन पद्धती निर्माण केली आणि ती नागरिकांच्या वापरासाठी खूपच सोयीची ठरली. म्हणून कोणीतरी विद्वानाने या व्यवस्थेला 'देवनागरी लिपी' हे नाव दिले. या लिपीतील 'ग', 'ण', 'श' ही तीन अक्षरचिन्हे या लिपीतील इतर चिन्हांपेक्षा वेगळी आहेत. या तीन चिन्हांच्या बाराखडीतील पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे.

    5 min
  • # 2138 : मेंदूतला स्विच ॲान करा, अन् बघा जादू..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

    Send us Fan Mail

    हार्वर्ड विद्यापीठातील एक अत्यंत बुद्धिमान मानसशास्त्रज्ञ – डॉ. एलेन लॅंगर – यांनी काहीतरी विलक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांना टाइम ट्रॅव्हल करायचे होते, पण कोणत्याही मशीनशिवाय..!!

    8 min
  • # 2137 : ‘भूतबाधेची खेळी‘. ले. अंड. रंजना पगार गवांदे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Send us Fan Mail

    संपत्ती वाढणं-टिकणं, आजार बरे करणं, संकटं, समस्या, यासाठी अशिक्षित लोकांबरोबरच, सुशिक्षित लोकही भोंदूगिरी, तंत्र-मंत्र, काळी जादू, जारण-मारणाचा आधार घेत असतात. अगदी अशीच ही घटना.

    8 min
  • # 2136 : ‘आपल्या मनासारखं वागावं की दुसऱ्याच्या?‘ लेखक व. पु. काळे. प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

    Send us Fan Mail

    आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं.

          *अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!*

    5 min

About Life of Stories

From the publisher's feed

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in…