मैफल सिझन ३ मध्ये 'रामूभैय्या दाते एक आनंदप्रवाह' ह्या पुस्तकाचा पॉडकास्ट तारीख़ ३ ऑगस्ट २०२२ पासून श्रीमती ज्योती दाते ह्यांच्या आवाजात सादर होत आहे. निमित्त आणि योगायोग म्हणजे ३ ऑगस्ट ही श्री रामू भैय्यांची ५५ वी पुण्यतिथी. श्री रवी दाते ह्यांनी आपल्या रसिकराज वडीलांच्या सर्व आठवणी आपली पत्नी श्रीमती ज्योती दाते हीच्या कड़ून ‘रामूभैय्या दाते एक आनंदप्रवाह’ ह्या पुस्तकरूपाने शब्दांकित करुन ठेवल्या. श्री रामू भैय्यांसारखे रसिकाग्रणी ह्या देशाला लाभले, यामुळे भारतीय संगीत एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले.
श्रीमती ज्योती दाते ह्यानी ‘मैफल पॉडकास्ट’ माध्यमातून स्वतःची अमूल्य पुस्तकें ता. २३.२.२०२२ पासून उपलब्ब्ध करुन दिली आहेत. त्यातील ‘रामूभैय्या दाते एक आनंदप्रवाह’ हे दुसरे पुस्तक मैफल सिझन ३ मध्ये सादर होत आहे.
सदर पॉडकास्ट मधील मते व अनुभव हे व्यक्तिगत आहेत. हा पॉडकास्ट ऐकताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा अयोग्य माहिती देण्याचा लेखिकेचा अथवा ह्या पॉडकास्टच्या हक्कधारकांचा हेतू नाही ह्याची कृपया सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. आपल्याला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे [email protected] ह्या इमेलवर जरूर कळवावे. धन्यवाद.
संकल्पना, रचना व तांत्रिक संयोजन: आशा आणी मिलिंद अग्निहोत्री
पॉडकास्ट निर्मात्या आणि सूत्रधार: श्रीमती ज्योती दाते
(C) ज्योती दाते, २०२२