
Sign up to save your podcasts
Or


ऑर्डर किती रुपयांची आहे, याचा विचार करु नका. जे काम करायचे आहे, ते उत्तम पद्धतीने करा. पैसा आपोआप येतो. उपलब्ध फंडस् चा वापर परिणामकारक पद्धतीने करायला हवा. आर्थिक शिस्त पाळायला हवी. ग्राहकांना संतुष्ट ठेवायला हवे. आम्ही सातत्याने हे फॉलो करतो.
`एलमेक इंजिनिअर्स`ची तिसरी पिढी अनुराग मोराणकर जे सांगतात, त्यात दडलं असतं त्या ग्रुपच्या यशाचं रहस्य.
कोरोनाने जगात मोठे नुकसान केले असेल, पण पोल्ट्री इंडस्ट्रीसाठी तो `लाइफ चेंजिंग` ठरला. प्रोटीनबद्दलची जनजागृती झाल्यानंतर प्रोटीनचा सर्वोत्तम स्त्रोत म्हणून मांसाहार आणि अंडी याकडे अनेकजण वळले. यामुळे हा उद्योग नव्या उंचीवर पोहोचला आणि उत्तम दर्जाचे चिकन पुरविण्याच्या मागणीतून `प्रो-चिकन` प्रस्थापित झाले.
`सिंथेटिक आयर्न ऑक्साईड पिग्मेंट` या पेंट इंडस्ट्रीतील घटकाचा उल्लेख आला, की `वेगा केमिकल्स`चे नाव समोर येते. भारतात त्यांना स्पर्धा नाही. जळगावमधून साऱ्या देशभरात पोहोचलेल्या या उद्योगाचे वेगळेपण हे आहे, की इथे संचालकांची दुसरी पिढी काम करते, तशीच कर्मचाऱ्यांचीही..!
शाकाहारी खाद्यांमध्ये डाळी हा प्रथिनांचा सर्वात मोठा स्त्रोत. या क्षेत्रातील देशात मान्यता पावलेले एक महत्त्वाचे नाव म्हणजे `दाल परिवार`. डाळींवर सर्वाधिक प्रक्रिया आणि डाळींची सर्वाधित निर्यात या दोन्ही गौरवांना अभिमानाने मिरवणारा, उत्तम दर्जाचे डाळ- उत्पादन करणारा `कोगटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज्` सचोटीच्या क्षेत्रातही तेवढाच अग्रेसर आहे.
ग्राहकांच्या गरजा ओळखून, त्यांना हव्या त्या पद्धतीने वेगवेगळे खाद्यपदार्थ पुरविणे ही `फूड इंडस्ट्री`ची गरज असणार आहे. १०० हून अधिक खाद्यपदार्थांची रेंज असलेला `रवि मसाले` हा उद्योग `रविमॅजिक` या नव्या रेंजमधून खूप वेगाने प्रगती साधत राज्यात व राज्याबाहेर आपले भक्कम स्थान निर्माण करीत आहे.
रासायनिक खतांनी तात्पुरती सोय होते, पण त्याचे दूरगामी परिणाम घातक असतात. जैविक खतांची भारतातील परंपरा जुनी आहे. तीच परंपरा पुढे चालवीत ऑरगॅनिक ॲग्री इनपूट`च्या क्षेत्रात महाराष्ट्रासह देशातील १९ राज्यांतून प्रभावी अस्तित्व निर्माण करण्यात महाराष्ट्र बायोफर्टिलायझर्स या कंपनीने मोठे यश मिळविलेले आहे. `थिंक बिग `हा मंत्र कसोशीने पाळणारे आपले वडील नीलेश ठक्कर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली कुशल यांचे व्यवसायकौशल्य विकसित होत गेले.
लिसनिंग मोअर-स्पीकिंग लेस हे धोरण सगळ्यांत महत्त्वाचं. आपण विरोधाला विरोध न करता मुद्दा समजून घेतला की मिळणारे उत्तर वादापेक्षा संवादी असते. त्या संवादातून मार्ग निघतो. त्या कसोटीच्या क्षणी शांत राहून ऐकून घेणे खूप महत्त्वाचे ठरते. तसेच महत्त्वाचे असते, ते बदलांना सामोरे जाणे. बदल चांगला असतो, बदलांचा अनुभव घेतला पाहिजे. अंकित काळे यांची उद्यमशील वाटचाल जणू हाच संदेश देते.
कधीही मी माझा पगार म्हणून गरजेपेक्षा जास्त रक्कम उचलली नाही. झालेला नफा कंपनीतच, नव्या `सीएनसी` आणि `कॅम`मध्ये गुंतवत गेलो. परिणामी कंपनी अद्ययावत होत गेली. मी कधी बाहेर गुंतवणूक केली नाही. स्टॉक मार्केटचा छंद धरला नाही की जमिनींमध्ये पैसा गुंतवला नाही, असे कौस्तुभ फडतरे सांगतात.
आईवडिलांनी दिलेले संस्कार आणि घालून दिलेले आर्थिक शिस्तीचे धडे काटेकोरपणे गिरवत आपल्या उद्योगाला नव्या उंचीवर नेणारा हा तरुण उद्योजक आर्थिक शिस्त आणि आधुनिक तंत्र यांचा मिलाफ कसा साधतो, हे ऐकणं म्हणजे आपणही समृद्ध होणं.
फार्मास्युटिकल्सचे क्षेत्र खूप मोठे आहे. बॅकवर्ड इंटिग्रेशनपासून फायनल प्रॉडक्टपर्यंत जेवढ्या गोष्टी आपल्या नियंत्रणात, तेवढा आपल्या उद्योगाचा विस्तार अधिक चांगल्या प्रकारे होतो. आपल्या उद्योगाला जागतिक स्तरावर प्रस्थापित करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी करण्यासाठी स्वराली सावे सज्ज आहेत.
उद्योगाच्या क्षेत्रात कुठल्याही समस्येचे उत्तर तंत्रज्ञान हेच असू शकते, यावर प्रगाढ विश्वास असलेले सुमित आणि कपिल आपल्या परिवाराच्या रंग उद्योगात उतरले. उद्योगाचा विस्तार करताना ते देशभरात पोहोचले. त्याच वेळी फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंटिग्रेशनच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रावरील आपली पकडही मजबूत केली.
From the publisher's feed