
Sign up to save your podcasts
Or


`सस्टेनेबल एनर्जी` ही भविष्यकाळाची गरज आहे. आपल्या वडिलांनी सुरु केलेला ऑटोमोबाईल पार्ट निर्मितीचा प्रस्थापित उद्योग सांभाळतानाच मिहिर वैद्य अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या क्षेत्रातील अभिनव उत्पादनाचे पेटंटही त्यांच्या नावावर आहे. एकाच वेळी पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ते कार्यरत आहेत.
`एफएमसीजी`चे विश्व खूप वेगाने बदलते आहे. दररोज बदलणाऱ्या आव्हानांना तोंड देत संकल्पित विस्ताराचे आराखडे प्रत्यक्षात उतरविण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी `पितांबरी ग्रुप` करीत आहे. या ग्रुपने केलेले विविध क्षेत्रांतील `डायव्हर्सिफिकेशन`सुद्धा यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावते. आपले वडील रवींद्र प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली रुजलेल्या, बहलेल्या `पितांबरी` समूहात त्यांची मूल्ये व व्यवसायसूत्रे जोपासत, पुत्र परीक्षित प्रभुदेसाई या उद्योगाची लकाकी वाढवित आहेत.
डाईज आणि टुल्सची निर्मिती व त्याआधारे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीसाठी प्लॅस्टिक मोल्डिंगचे विविध पार्टस् यांची निर्मिती करणारा एक छोटा उद्योग जेमतेम चार दशकांत देशातील सहा ठिकाणी युनिटस् आणि सुमारे ३०० कोटी रुपयांची उलाढाल या टप्पांवर पोहोचला. नरेश राऊत यांनी मोठ्या कष्टांतून फुलवलेला हा उद्योग त्यांची मुले निखिल आणि अभिजित यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. त्याची ही विलक्षण कहाणी.
`बिसनेस विथ प्राईड अँड प्लेजर` असे ब्रीद ठरवून उद्योग उभा करण्याचे आणि विस्तारण्याचे अनुकरणीय उदाहरण म्हणजे यशप्रभा ग्रुप. बाजारपेठेतील नव्या वाटा शोधत, नवी उत्पादने निर्माण करत आणि भारताबाहेर पडून नवनव्या देशांत उद्योगाचा विस्तार करीत वाटचाल करणारा हा उद्योगसमूह आता नव्या पिढीच्या नेतृत्वाखाली हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या पार्श्वभूमीवर, त्याची धुरा खांद्यावर आलेले अमित यशवंत घैसास यांनी `मालकाचा मुलगा` ही ओळख पूसत `उद्योगसमूहाचा सक्षम वारसदार` ही प्रतिमा कशी प्रस्थापित केली, हा प्रवास खूप बोलका आहे.
`वन स्टॉप ॲग्री शॉप` ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत जैन इरिगेशन उद्योग समूहाने शेतीप्रधान भारतात मोठी आघाडी घेतली. व्यावसायिक आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर आपले वेगळेपण सिद्ध करीत, सातत्याने नवनवी उत्पादने बाजारपेठेत आपण त्यांनी आपला व्यवसाय चढत्या वाढत्या क्रमाने वर्धिष्णू राखला. अथांग आणि अभेद्य जैन यांच्या रुपाने जैन परिवारातील तिसरी पिढी उद्योगात आली आहे. आपल्या व्यवसायाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, भविष्यवेधी कल्पना काय आहेत याची ही उलगड...
फर्स्ट जनरेशन आंत्रप्रिन्योर म्हणजेच पहिल्या पिढीतील उद्योजक या विषयावर विपुल लेखन झाले आहे. अशा लोकांच्या सक्सेस स्टोरीज् आपणा सर्वांना प्रेरणा देत असतात. मात्र, दुसऱ्या पिढीतील म्हणजे `नेक्स्टजेन` मधील उद्योजकांच्या वाटचालीचा वेध घेत त्यांचा संघर्ष, त्यांचे अनुभव, आव्हानांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांना भिडण्याचे धैर्य अशा गोष्टी आपणापुढे येतातच असे नाही. म्हणूनच प्रेरक लेखक दत्ता जोशी यांनी पुढची पिढी व त्यांच्या यशाची गोष्ट सांगण्यासाठी अत्यंत प्रयत्नांतून एक शोधयात्रा केली. `मूव्हिंग अॅस्पिरेशन्स` मधील प्रत्येक गोष्ट या नवकर्तृत्वाच्या शोधयात्रेतील एक एक टप्पा. याच संकल्पनेविषयी...
From the publisher's feed