रामकुटी (Ramkuti)

रामकुटी (Ramkuti)

By Shrikant BorkarBusinessManagement
Download on the App Store

रामकुटी (Ramkuti) episodes

  • श्री सद् गुरू प्रार्थना
    डॉ. सौ. संगीता ताई
    https://youtu.be/bo0AjkKLXWI

    | सदगुरु नाथा हात जोडीतो प्रार्थना ||सदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु।ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू॥धृ०॥निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ।ह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु॥१॥उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू।बोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ॥२॥कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू।करी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू॥३॥अजाण हतबल भ्रमीत मनिची तळमळ कशी साहू।निरसूनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू॥४॥
    4 min
  • तू माझा यजमान रामा आणि हि राम नाम नौका भवसागरी तराया (भैरवी)
    89 वर्षाच्या (श्रीमती सुमन दत्तात्रय घाटे ) आजी यांनी म्हटलेले सुंदर भजन आणि भैरवी.तू माझा यजमान रामा,तू माझा यजमान ||धृ||जननी जठरी रक्षियले मज,पोसुनी पंचहि प्राण ||१||बाहेर निघता मातेचे स्तनी,पय केले निर्माण ||२||ऐसे असता या पोटाची,का करू चिंता जाण ||३||मध्व मुनीश्वर स्वामी रमापती,धरी माझा अभिमान ||४||
    आणि
    ही रामनाम नौका | भवसागरी तराया ||मद, मोह लोभ सुसरी | किती डंखिती विषारी |ते दुःख शांतवाया | मांत्रिक रामराया ||सुटले अफाट वारे | मनतारू त्यात बिथरे |त्या वादळातुनी या नेईल रामराया ||भ्रम भोवऱ्यात अडली | नौका परी न बुडली |धरुनी सुकाणू हाती | बसलेत रामराया ||आम्ही सर्वही प्रवासी | जाणार दूरदेशी |तो मार्ग दाखवाया | अधिकारी रामराया ||हा देह नाशिवंत | जाण्यास ना समर्थ |तारी तारी रामराया | दीनदास लागे पाया ||
    4 min
  • प्रमाण
    कवी कृष्णाजी नारायण आठल्ले यांची कविता
    सौ रेखा ताई देशपांडे यांनी म्हटले आहे.
    अतिशय सुंदर रचना.

    *ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.*

    *अतीकोपता कार्य जाते लयाला,
    *अती नम्रता पात्र होते भयाला ।
    *अती काम ते कोणतेही नसावे,
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।*

    *अती लोभ आणी जना नित्य लाज,
    *अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
    *सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,
    *प्रमाणामधे सर्व काही असावे ।।* २ ।। ...........
    8 min

About रामकुटी (Ramkuti)

From the publisher's feed

राम कुटी पॉडकॉस्ट विविध प्रकारचे स्तोत्र साठी आहे ही स्तोत्रे राम रक्षा व्हाट्सअप ग्रुप मधील साधकांच्या आवाजात आहे. Join Telegram group https://t.me/+2B4YTIfT--BiMWZl