रॉबिन्सन मेमोरियल मेथडिस्ट मराठी सेंट्रल मंडळी,
०९/१०/२०२० संध्या. ७ वाजता
उपासनेस आवाहन: स्तोत्र. १०५:१-४
मध्यस्थिची प्रार्थना: मंडळीचे पाळक
गीत: उपासना संगीत क्रं. ५३८
प्रभूचें कार्य पुढे चालवा. ।।ध्रु॥
शरीर आपण त्या शीर्षाचें नित्य मनीं वागवा; प्रभूचें कार्य पुढे चालवा. ।।१।।
प्रभु सेनानी, चला पुढे व्हा चला करा आहवा; चला करा आहवा, प्रभु चे कार्य पुढे चालवा. ।।२।।
पापात्म्याची मोडा सत्ता, ख्रिस्तीपण गाजवा, ख्रिस्तीपण गाजवा, प्रभु चे कार्य पुढे चालवा. ।।३।
प्रभुसंस्थापित देवाजीचें राज्य जगी वाढवाः राज्य जगी वाढवाः प्रभूचें कार्य पुढे चालवा, ।।४।।
पावित्र्याचा, शांतिमुक्तिचा मार्ग जगा दाखवा; मार्ग जगा दाखवा;
प्रभूचें कार्य पुढे चालवा. ।।५।।
पवित्र शास्त्र पठन: स्तोत्र. २२:२५-३१