लैंगिकतेबद्दल समाजात तसंही फारसं बोललं जात नाही आणि मग जर कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असेल तर लैंगिकतेचा प्रश्न अधिकच बिकट बनतो. अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना जणू काही लैंगिक गरजा नसतातच किंवा त्या नसाव्यात असाच समाजाचा समज असतो. पण हे खरं नाही. शरीराची एखादी क्षमता कमी आहे याचा अर्थ या भावना किंवा लैंगिक नाती ठेवण्याची इच्छा निर्माण होणार नाही असं थोडंच आहे? त्यातही मानसिकदृष्ट्या अपंगत्व असेल, मतिमंदत्व, गतिमंदत्व, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, अशा मानसिक स्वरुपाच्या अपंगत्वामध्ये भावना, त्यांची अभिव्यक्ती या गोष्टी अधिकच गुंतागुंतीच्या होतात.
म्हणुनच याच विषयावर माहिती देण्यासाठी तथापि ट्रस्ट सोबत ‘अपंगत्व आणि शरीर साक्षरता व लैंगिकता’ याविषयी मागील दोन वर्षापासून काम करणा-या सुषमा खराडे आज आपल्याकडे आलेल्या आहेत. या कामामध्ये त्यांना आलेले अनुभव, पालकांना येणा-या अडचणी, पालकांसाठी तयार केलेले स्वीकार आधार गट कसे काम करतात, अपंगत्व आणि लैंगिकतेबाबत पालक-शिक्षक-नातेवाईक म्हणुन सकारात्मक मार्ग काय असू शकतात किंवा काय मार्ग इतरांनी शोधले आहेत, अशा अनेक बाबींवर आज चर्चा झालेली आहे.
चला तर ऐकूया निहार अन गौरी सोबत ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ या विषयावरील हा पहिला भाग.
आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.
आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा…
तेव्हा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत ऐकायला विसरू नका.. सेक्स आणि बरंच काही सिझन २.