आपल्या पिढीतील शालेय जीवनात, कवी आणि कवितांच्या वहीची जे महत्त्व होतं, त्या हळूवारपणे उलगडणारी एक सहज सुंदर आठवण.कवितांचा आपल्या मनावर,आयुष्यावर नकळतपणे होणारा परिणाम.. आणि त्याद्वारे घडणारे संस्कार आपल्या लाडक्या कविंच्या निवडक कवितांच्या आठवणींसह आपल्याला थेट शाळेतल्या बाकावर नेऊन सोडतात. हा सहज सुंदर तरल अनुभव घेण्यासाठी नक्की ऐका.. कवितांची वही..!