*तिचे थांबणे ....*
*असं म्हणतात, की वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही...पण वेळेचं गणित साधणाऱ्या 'ती' ला मात्र थांबावं लागतं वेगवेगळ्या रूपात ! --उदाहरणार्थ साध्या-साध्या गोष्टी--*
*पोळपाटावर एक पोळी लाटून तयार असते, इतकी जलद ..*.
*पण 'ती' तिथे थांबून रहाते, तव्यावरची आधीची पोळी नीट भाजून होईपर्यंत. कंटाळा आला म्हणून अर्धी-कच्ची सोडत नाही...*
*कधी घामाघूम होऊन, कधी पाय, कधी पाठ दुखत असते... तरीही*
*सगळी कामे आटोपल्यावरही,ती ओट्यापाशी थांबते, गॅसवरचं दूध ओतून , वाया जाऊ नये म्हणून.*
*तशीच,*
*जोडीदार आकाशी उंच झेप घेत असताना, घरट्यातल्या पिलांच्या पंखात बळ येईपर्यंत , 'ती' थांबते.*
*शी-शु सांगता येणाऱ्या, पण आपले आपण आवरता न येणाऱ्या मुलांबाळांसाठी, कधी सोबतीला.... बाथरूमच्या दारापाशी ती थांबून असते.*
*मुलांकडून अभ्यास करून घेताना, शब्द- वाक्य- गणितं- व्याकरण सगळं बरोबर येईपर्यंत 'ती' थांबते.*
*मुलं लहान असो नाहींतर मोठी...परीक्षा, पालक-सभा, त्यांचं अभ्यासासाठी पहाटे लवकर उठणं, रात्री उशिरा झोपणं....सगळ्यासाठी ती त्यांच्या पाठीशी थांबते.*
*चहा-कॉफीचा एक निवांत घोट नवऱ्यासोबत घ्यायचा म्हणून थांबते*
*तेवढ्याच चार निवांत गप्पा होतील, एकमेकांचे त्रास-ताण , शेअर* *करण्यासाठी.*
*घरातल्या सगळ्यांना जेवण वाढून होईपर्यंत... कुणी उशिरा येणार असेल तर तोपर्यंत... 'ती' थांबते, जेवायची.*
*सगळ्यांच्या पाठीशी 'ती', थांबते.*
*खरंतर ती पाठीशी थांबते म्हणून सगळे चाललंय....व्यवस्थित.*
*काय हरकत आहे हे मान्य करायला...*
*तिच्या या, थांबण्यातही एक ऊर्जा आहे* ..*.त्या ऊर्जेमुळेच वेळ चांगली चालली आहे.*
*गेले जवळजवळ तेरा महिने महाकठीण प्रसंगाला सगळं जग तोंड देतंय,*
*पण इथे वेळ भराभर निघून जातेय.*
*अशा वेळेस प्रत्येक घरात, ती मात्र पाठीशी 'थांबून' आहे ....अगदी स्ट्रॉंग...*
*एकही दिवस kitchen बंद नाहीये,*
*कंटाळा येतो, थकवा ही...तरीही*
*रोजच्या-रोज सगळी स्वछता,*
*extra काळजी,*
*कोणत्याही आजारपणाला घरात शिरकाव करू द्यायचा नाही असं तिने मनाशी पक्क ठरवलंय.*
*म्हणूनच म्हंटल, तिच्या या, थांबण्यातही एक ऊर्जा आहे...त्या उर्जे मुळेच ही अशी कठीण वेळ ही निघून जाईल...!!!*
*प्रत्येक घरातील 'तिला' सादर नमन.*