Share Think Bank
Share to email
Share to Facebook
Share to X
By Think Bank
The podcast currently has 14 episodes available.
क्वेस्ट (Quest) ही संस्था नक्की काय काम करते? अभिनयाबरोबर या संस्थेसाठी काम करावंसं का वाटलं? क्वेस्ट (Quest) मधून रिटायर व्हायचा निर्णय का घेतला? तरुणांनी राजकारणात यायची गरज आहे का? आपल्या शिक्षण संस्थेतच चूक आहे? समाज सेवा ही सेकंड इनिंग असते? एंटरटेनमेंट इंडस्ट्री कडे सध्याच्या जगात कसं बघता? सोशल मीडिया मुळे सेलिब्रिटीजचं आयुष्य नक्की कसं बदललं? अभिनेते कोणत्याच मुद्द्यावर ठाम भूमिका घेत नाहीयेत का? आत्ताच्या राजकीय परिस्थितीकडे बघताना तुम्हाला काय वाटतं? भारताच्या राजकारणाची भविष्यातील दिशा कशी असायला पाहिजे?
प्रख्यात अभिनेता अतुल कुलकर्णी यांची मुलाखत.
#thinkbank #filmindustry #marathifilms #atulkulkarni
प्रत्येकाने स्टॉक मार्केट मध्ये का आलं पाहिजे? शेअर मध्ये लाखाचे बारा हजार होतात का? एखादा शेअर कधी घ्यावा आणि कधी विकावा? तरुणांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करावी का? एखाद्या कंपनीचे मूल्य कसे ठरते? आर्थिक साक्षरता किती गरजेची आहे आणि कुठून शिकता येते? आजच्या तरुणांनी गुंतवूणक कशी आणि कुठे करावी? ४०व्या वर्षानंतर पैश्यासाठी काम करायची गरज लागायला नको या साठी काय करावे? शेअरमार्केटमधून खरंच खूप पैसा मिळतो?
"Romancing the Balance Sheet" व "Flirting with stocks" अशा आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक, कार्पोरेट ट्रेनर, फायनान्स गुरू "अनिल लांबा" यांची मुलाखत.
#sharemarket #personalfinance #finance #thinkbank
पुढील दशकातील जगासमोर कोणती आव्हाने आहेत? जगाने कोरोनाकडून कोणते धडे घेतले? आजचे राजकीय नेते संपूर्ण मानवजातीचे संरक्षण करण्यास असक्षम आहेत का? काही राष्ट्रे उग्र राष्ट्रवादाला का प्रोत्साहन देत आहेत? ट्रम्प यांना अमेरिकेतून इतका मोठा पाठींबा का मिळाला? ट्रम्प यांच्या पराभवाने आक्रमक राष्ट्रवादी ताकदीचा पराभव होईल का? पुढील दशकात कोणत्या गोष्टी देशांनी केल्या पाहिजे? २०३० चा भारत कसा असेल?
स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष व ६५ देशांचे सल्लागार संदीप वासलेकर यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग २
हे हरवलेलं दशक आहे असं का वाटतं? या दशकात अतिरेकीपणा आणि उग्र राष्ट्रवाद का वाढला? पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून हे दशक कसं होतं? न्यू स्टार्ट ट्रीटी काय आहे? जागतिक संघटना का मोडकळीस आल्या? केवळ विज्ञानातच देशाने प्रगती केली? नैतिक मूल्य असलेला जागतिक नेता का नाही? शांततेच्या दिशेने जाणाऱ्या जगाला कुठे ब्रेक लागला?
स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष व ६५ देशांचे सल्लागार संदीप वासलेकर यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग १
पोस्ट कोविड अर्थव्यवस्था कशी असेल? अर्थव्यवस्था नीट रुळावर येण्यासाठी काय करायला पाहिजे? आत्मनिर्भर भारत म्हणजे नेमका कसा? कोरोनानंतर 5 ट्रिलियन इकोनॉमी चे स्वप्न खरंच पाहावे का? चीन सोबतचे बहिष्कार धोरण किती योग्य? भारतीयांची खरेदी करण्याची क्षमता संपली आहे का? मोदी सरकारने कोणत्या क्षेत्रावर अधिक भर दिला पाहिजे? पुढील दशकतील अर्थव्यवस्थेसमोरील प्रमुख आव्हाने कोणती?
ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रदीप आपटे यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग 2
2010 ते 2020 हे दशक आर्थिकदृष्ट्या कसे होते? यूपीए काळातील योजना मोदी सरकारने पुढे चालवल्या? या दशकातील प्रमुख आर्थिक समस्या कोणत्या? या दशकात केंद्र आणि राज्य वाद का उफाळून आला? नोटबंदी मुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला नाही? GST ला काँग्रेस का विरोध करत आहे? शेतकरी आंदोलन कसे हाताळायला हवे? या दशकातील अर्थव्यवस्थेतील मंदी कशामुळे आणि कधी पर्यंत? मोदी सरकारच्या काळात आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे का?
ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रदीप आपटे यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग १
भारतासमोरील पुढील दशकातील प्रमुख आव्हाने कोणती? पर्यावरण समस्या आणि भारत: आव्हानेच आव्हाने? भारताने २०३० पर्यंत १० ट्रिलियन इकॉनॉमीचे स्वप्न का पाहावे? नोकऱ्या तयार करणारा बाजार का शक्य नाही? पुढील दशकातील तरुणांसाठीची आव्हाने कोणती? भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून कोण असू शकतो? पुढील दहा वर्ष मोदीच पतंप्रधान असतील? काँग्रेसचे पुनर्जीवन खरंच शक्य आहे? दोन धर्मातील ताण हा परदेशी कट? सरकारी यंत्रणा बदलांना का सामोरी जात नाही?
माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग २
दोन मोठ्या जगातील संकटामधील हे दशक नेमकं कसं होतं? चीन प्रमुख शत्रूराष्ट्र म्हणून या दशकात उदयास आला? राष्ट्रवादी विचारांचा प्रसार केवळ याच दशकात? राष्ट्रवादावर कुणाची मक्तेदारी असू शकते का? स्वातंत्र्यापासून भारताला प्रमुख विरोधी पक्षच मिळत नाही? अण्णा आंदोलन ते शेतकरी आंदोलन हा लोकशाहीचा जागर? या दशकात काय घडलं काय बिघडलं?
माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग १
कसं असेल नव्या दशकातील नवं राजकारण? देशाची आर्थिक बाजू ढासळत असताना नरेंद्र मोदींचा करिष्मा अधिक वाढतो आहे, असं का? 2024 मध्ये पुन्हा मोदीच निवडून येतील का? भाजप विरुद्ध लढण्यासाठी विरोधी पक्षांनी काय करायला हवं? माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय राजकारण कसं असेल? भारतात सरकार कुणाचं असेल हे उद्योगपतीच ठरवतील का? भारतात अतिलोकशाही झाली आहे का? काँग्रेसचे भविष्य काय? 2030 पर्यंत भारतात लोकशाही उरणारच नाही? भारतीय राजकारणातील पुढील दशकतील 3 आव्हाने कोणती?
जेष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांची दशवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग 2
या दशकात भारतीय राजकारणाचा पट कसा बदलला? आण्णा आंदोलन ते आताचे शेतकरी आंदोलना मध्ये काय घडलं काय बिघडलं? मोदी सरकारचा आर्थिक विकासापेक्षा सांस्कृतिक विकासावर अधिक भर आहे? संघ आणि भाजप यामध्ये सत्तेची वाटणी कशी आहे? तथाकथीत काँग्रेस सिस्टिम चे काय झालं? खरंच काँग्रेस संपली आहे का? विरोधी पक्ष, माध्यमे आणि लोक मोदी सरकार विरुद्ध बोलायला का घाबरत आहेत? भारतीय माध्यमे एकतर्फी का झाली? मोदींनी भारतीय राजकारणात "आयर्न हॅन्ड" तयार केला आहे का?
जेष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांची दशवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग १
The podcast currently has 14 episodes available.