Share TLP Podcast Marathi
Share to email
Share to Facebook
Share to X
By TLP Podcast Marathi
The podcast currently has 6 episodes available.
"उपदेशो हि मूर्खाणां" हा वाक्प्रयोग जेव्हा एखादी व्यक्ती कुणी जाणकाराने दिलेला मोलाचा उपदेश अंगीकारत नाही, आणि आपल्या मनाने चुकीचा मार्ग निवडते आणि संकटात सापडते अशा वेळी वापरतात. उपदेश केलेला सहसा कुणाला आवडत नाही. त्यातून उपदेश करणारी व्यक्ती प्रत्यक्ष मदत न करता नुसताच उपदेश करीत असेल, तर त्या व्यक्तीबद्दल मनातून चीडच येते. त्यातूनही एखाद्या सुजाण व्यक्तीला उपदेश केला तर त्याला फायदा होईल, पण मूर्खाला उपदेश करणे व्यर्थच आहे. पावसात भिजलेल्या माकडांना चिमण्या उपदेश करतात कि तुम्ही आमच्यासारखे आधीच घरटे का बांधून ठेवीत नाही, त्यावर चीड येऊन माकडे चिमण्यांची घरटी उध्वस्त करून टाकतात.
सुभाषितात दडलेला दुसरा अर्थ म्हणजे "एकामागून एक संकटे येणे" आता अशी परिस्थिती का उद्भवते तर, पहिले संकट येताच माणूस घाबरतो आणि काहीतरी चूक करतो, त्यातून दुसरे संकट उभे राहते, मग तिसरे.
Listen Our Podcast on Your Favorite Platform:
Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor
Follow Us on Social Media Platforms:
LinkedIn | Instagram | Facebook
एखादी लहानशी चूक सुद्धा वेळेवर सुधारली नाही तर त्यातून पुढे अनर्थ निर्माण होतात. ज्याप्रमाणे वेळेवर घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो. "A stich in time saves nine" हा वाक्प्रचार सगळ्यांना माहिती असतो.
Listen Our Podcast on Your Favorite Platform:
Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor
Follow Us on Social Media Platforms:
LinkedIn | Instagram | Facebook
चाणक्य नीति मधील हा श्लोक आपल्याला सांगतो कि, घडून गेलेल्या गोष्टीबद्दल खेद करीत बसू नये, तसेच भविष्यात काय होणार आहे ह्याची चिंता करीत बसू नये. सांडलेले दूध जसे पुन्हा वापरता येत नाही, तसेच एखादी चूक हातून घडल्यामुळे अपयश आले असेल, तर ती वेळ पुन्हा हाती येणार नाही. म्हणून ती चूक सुधारून पुढचा मार्ग स्वीकारणे मनुष्याला त्याच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. तसेच पुढे काय होईल याची चिंता करीत बसणे अजिबात योग्य नाही, कारण भविष्य कधीच आपल्या स्वाधीन नसते. "गतं न शोच्येत्", आणि "भविष्यम नैव चिंतयेत्" या दोन चरणाचा प्रयोग वेगवेगळा देखील करतात.
Listen Our Podcast on Your Favorite Platform:
Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor
Follow Us on Social Media Platforms:
LinkedIn | Instagram | Facebook
"विक्रमार्जितसत्वस्य स्वयमेव मृगेंद्रता"
समाजात मान मान्यता, प्रतिष्ठा, लौकिक मिळवण्यासाठी काही व्यक्ती दान देण्याचा अवलंब करतात. काही जनसेवा करण्याचे नाटक करतात. आपले भाट जमवून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतात. आपले नाव लोकांपुढे यावे म्हणून धडपडतात. पण खऱ्या कार्यकर्त्याची ओळख त्याच्या कार्यातूनच पटते. तो कधीही पुढे पुढे करताना दिसत नाही, परंतु त्याच्या व्यक्तिमत्वाचे तेज लपून राहू शकत नाही. अशा कार्यकर्त्याचे वर्णन करताना वरील वाक्प्रयोग वापरला जातो.
Listen Our Podcast on Your Favorite Platform:
Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor
Follow Us on Social Media Platforms:
LinkedIn | Instagram | Facebook
अश्वं नैव, गजं नैव, व्याघ्रं नैव च नैव च। अजापुत्रं बलिं दद्यात्, देवो दुर्बलघातक: ।।
देव देखील दुर्बल लोकांचाच घात करतो, अशा अर्थाने वरील वाक्प्रचार वापरल्या जातो. देव आपले रक्षण करतो, असे आपण म्हणतो, पण जेव्हा बळी दिल्या जातो तेव्हा गरीब दुर्बळ बकरीचाच बळी दिल्या जातो. घोडा, हत्ती किंवा वाघाची त्यासाठी निवड होत नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे. पण तुम्ही दुर्बळ राहिलात तर देव सुद्धा तुमची मदत करू शकणार नाही असा याचा अर्थ घ्यावा........
The podcast currently has 6 episodes available.