कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करुन यावर्षीही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळांकरिता मूर्ती 4 फूट व घरगुती गणपतीसाठी 2 फुटांच्या मर्यादेत असावी, अशी सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.