शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत प्रभारी अधिकार्यांची जिल्ह्यांतर्गत खांदेपालट करण्यात आली आहे. 26 प्रभारी अधिकार्यांच्या बदलीचे आदेश मंगळवार, 24 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले आहेत. यात शहरातील शनिपेठ, तालुका, जिल्हापेठ, जळगाव शहर, रामानंदनगर व शहर वाहतूक शाखेला नवे प्रभारी अधिकारी मिळाले आहेत.