पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत केंद्र सरकारने नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील घरकुलांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सर्व नगरपालिका क्षेत्रात एकुण 2 हजार 91 घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे, अशी माहिती खा.डॉ.हीना गावित यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.