रुग्णवाहिकेतून येत चारचाकी चोरीचा प्रयत्न करणार्या दोन संशयितांना रविवारी सायंकाळी जळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. योगेश संजय बाजड (वय 23) रा.गेंदालाल मील व दिनेश शिवदास राठोड (वय 24) रा.वाघनगर जळगाव अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्याकडून गुन्हा करतांना वापरलेली रुग्णवाहिकाही जप्त करण्यात आली आहे