आज २२ फेब्रवारी म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्काऊट दिन. स्काऊट दिन काय असतो? कोणती मुले त्यात सहभागी होऊ शकतात? विद्यार्थ्यांना त्याचा काय फायदा होतो? समाज व देशसेवेत स्काऊटचे कार्य काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे स्काऊटमध्ये १८ वर्षांपासून कार्यरत असलेले प्रा. प्रशांत सोनवणे यांनी आमच्या गप्पा सदरात दिली.
स्काऊटमुळे येणारी भावी पिढी स्वावलंबी, चारित्र्यवान आणि सामर्थ्यसंपन्न होते. त्यांच्यांत नीतीमूल्य, समाजसेव व देशप्रेम हे गुण रुजतात, असे प्रा. सोनवणे यांना सांगितले.