तालुक्यातील खेडी शिवारात माऊलीनगर श्रीकृष्णनगर या ठिकाणच्या एकूण चार घरांमध्ये हॉकी स्टीक, टॉमी या साहित्यासह दरोडेखोरांनी शनिवारी मध्यरात्री 1 ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत धुमाकूळ घालत ऐवज लांबविला. एका घरात वृद्ध दाम्पत्य उठल्याने वृध्द दाम्पत्यासह त्यांच्या नातवाला दरोडेखोरांनी लाकडी बॅट, हॉकीस्टीकने मारहाण करत रक्तबंबाळ केले व घरातून 50 हजारांची रोकड, वृध्देच्या गळ्यातील मंगलपोत जबदरस्तीने तोडून नेली.