शहरातील तरूणाला मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडेचार लाखात फसवणुक करणार्या एकाला आझादनगर पोलिसांनी वाराणसीतून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याने अशा प्रकार अनेक तरूणांना गंडविल्याचे समोर आले आहे.