जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
... moreShare गोष्ट दुनियेची
Share to email
Share to Facebook
Share to X
By BBC Marathi Audio
जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
... more4.2
55 ratings
The podcast currently has 128 episodes available.
कॅनडाच्या जॅस्पर शहरात जुलै-ऑगस्टमध्ये मोठा वणवा पेटला. अशा आगींवर नियंत्रण कसा मिळवायचं?
अनेक देशांतील माध्यमांमध्ये रुपर्ट मरडॉक यांची गुंतवणूक आहे. त्यांचे वारसदार कोण होणार?
इस्रायल-हमास संघर्ष आता हिजबुल्लाह-इराणपर्यंत पोहोचला आहे.मग मध्यपूर्वेत शांतता कशी येईल?
अफगाणिस्तानात अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मग तिथलं तालिबान सरकार कसं काम करतंय?
इस्रायल-हमास युद्धाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. पण इथला संघर्ष वर्षानुवर्ष जुना आहे.
पॅसिफिक महासागरात रापानुई बेट हे जगातल्या मानवी वस्ती असलेल्या सर्वात दुर्गम जांगांपैकी एक आहे. या बेटावर शेकडो प्राचीन मूर्ती आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे इथे बरेच बदल होताना दिसत आहेत. गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात आपण हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की ईस्टर आयलँडवरचे हे पुतळे हवामान बदलाचा मार झेलू शकतील का?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
अमेरिकेतल्या एका कोर्टानं दिलेल्या निर्णयानं गुगलविषयी प्रश्न निर्माण केले. सर्च मार्केटमध्ये सर्वात बळकट कंपनी म्हणून गुगल आपल्या वर्चस्वाचा गैरफायदा घेत असून त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना वाव मिळणंच कठीण झालं आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे.
अनेकांच्या मते ही कंपनी एवढी मोठी झाली आहे की त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण जाईल. गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात जाणून घेऊया की आपण गुगलवर विश्वास ठेवू शकतो का?
लेबननमधली संघटना हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष गाझामध्ये गेल्या वर्षी युद्ध सुरू झाल्यापासून आणखी गहिरा झाला आहे. अनेक देशांनी या संघटनेला दहशतवादी संघटना असा दर्जा दिला आहे. पण ही संघटना नेमकी काय आहे? त्यांना काय हवं आहे? हिजबुल्लाह गाझामधल्या पॅलेस्टिनी लोकांना आणि हमास या संघटनेला पाठिंबा देत आहे की इस्रायलचं लक्ष या युद्धात गुंतलंय याचा फायदा घेत आहे?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकी आधी 'प्रोजेक्ट 2025'ची चर्चा आहे. काही लोकांच्या मते ही यशाची किल्ली आहे तर अनेकांच्या मते हे धोकादायक असून यामुळे समाजात दुफळी माजेल.
सोमवार 26 ऑगस्ट, 2024 रोजी संपूर्ण कोकणात जोरदार वाऱ्यासह पाऊस सरू होता, तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणइथल्या राजकोट किल्ल्यावर उभा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.
या 28 फूट उंच पुतळ्याचं अवघ्या 9 महिन्यांपूर्वी, म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालं होतं. त्यामुळे त्यावरून राग आणि संताप राज्यभरात व्यक्त करण्यात आला.
पुतळा बांधतांना निकष पाळले गेले नाही, भ्रष्टाचार झाला, असे आरोप विरोधी पक्षांनी केले, तर सत्ताधाऱ्यांना यासाठी माफी मागावी लागली.
बांगलादेशातल्या कोटाविरोधी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं, पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावं लागलं, आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या पुतळ्याची अशीच नासधूस करण्यात आली.
पण पुतळेच का? कुठल्याही संस्कृतीत हे निर्जीव, मुके पुतळे इतके महत्त्वाचे का असतात? एखाद्या ठिकाणी पुतळा का उभारला जातो? किंवा कुठल्याही आंदोलनादरम्यान, क्रांतीदरम्यान पुतळे का पाडले जातात?
आज गोष्ट दुनियेची ऐकताना याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
The podcast currently has 128 episodes available.
111,425 Listeners
15 Listeners
4 Listeners
83 Listeners
251 Listeners
61 Listeners
0 Listeners
2 Listeners
1 Listeners
11 Listeners
15 Listeners
6 Listeners
12 Listeners
12 Listeners