दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
... moreShare सोपी गोष्ट
Share to email
Share to Facebook
Share to X
लहान मुलांची उंची त्यांच्या वयासाठी अपेक्षित उंचीइतकी नसेल, तर याला Stunting - वाढ खुंटणं म्हटलं जातं. पुरेसं पोषण मिळत नसल्याची ही खूण असल्याचं मानलं जातं. भारतामध्ये आणि आफ्रिकेतल्या सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडच्या देशांमध्ये - म्हणजे Sub Saharan Africa भागामध्ये लहान मुलांची वाढ अशी खुंटण्याचं प्रमाण अधिक आहे. भारतातलं हे प्रमाण सहारा वाळवंटाखालच्या आफ्रिकन देशांपेक्षाही अधिक असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय.यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरत असल्या तरी सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरतोय - जातीभेद. जातीचा परिणाम लहान मुलांच्या वाढीवर होतोय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : सौतिक बिस्वास
क्रेडिट कार्डच्या वापराबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. हे कार्ड वापरण्यात खरंच खूप धोके आहेत का? त्याचा वापर करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? रोजच्या व्यवहारात क्रेडिट कार्ड वापरून आपला काही फायदादेखील होऊ शकतो का?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : टीम बीबीसी
गेल्या काही दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरामध्ये मोठी घसरण होत, रुपयाने निचांक गाठलाय. यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाल्याने रुपयाच्या दरावर त्याचा काय परिणाम झालाय? आणि या गोष्टीचा सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधल्या एका फोटोवरून जगभरातल्या लोकांना सुनीता विल्यम्स यांच्या तब्येतीची काळजी वाटली. बोईंग स्टारलायनरमधून 8 दिवसांच्या चाचणी मोहीमेसाठी अंतराळात गेलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे स्टारलायनरमधल्या बिघाडांमुळे अंतराळ स्थानकातच अडकले. प्रवाशांना परत घेऊन येण्यासाठी स्टारलायनर सुरक्षित न ठरल्याने सप्टेंबर 2024 मध्ये हे यान रिकामंच पृथ्वीवर परत आणलं गेलं. फेब्रुवारी 2024 मध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर स्पेस एक्स्च्या यानाने पृथ्वीवर परततील.
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष झाल्याने हवामान बदल रोखण्यासाठीच्या प्रयत्नांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातेय. डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदल हा एक भ्रम, स्कॅम असल्याचं यापूर्वी म्हटलं होतं. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकेचा पॅरिस करारातला सहभाग काढून घेतला होता. यावेळीही ते बाहेर पडतील अशी भीती व्यक्त करण्यात येतेय. ट्रम्प यांच्या विजयामुळे काय आणि कसे परिणाम होऊ शकतात? जगभरातल्या पर्यावरण तज्ज्ञांना ही भीती का वाटतेय?
रिपोर्ट - टीम बीबीसी
जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये बिटकॉईनचं स्थान महत्त्वाचं आहे. अब्जावधींचं मूल्य असणाऱ्या बिटकॉईनचा शोध लावणारी व्यक्ती - सातोशी नाकामोटो, नेमकी कोण आहे, हे अजूनही जगाला माहिती नाही. ही व्यक्ती कशी दिसते, किती वयाची आहे हे स्पष्ट झालं नाही. आजवर अनेकांनी आपणच सातोशी नाकामोटो असल्याचा दावा केलाय. पण हे दावे खरे ठरलेले नाहीत. काय अजून माहिती आहे या सातोशी नाकामोटोंबद्दल...
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
डासांद्वारे पसरणाऱ्या डेंग्यू, यलो फीव्हर आणि झिकासारख्या आजारांना रोखण्यासाठी संशोधकांनी एक अनोखा मार्ग शोधून काढलाय. नर डासांना बधीर केल्यास त्यांचं मादीसोबत मिलन होऊ शकत नाही आणि परिणामी पैदास होत नसल्याचं संशोधनात आढळलंय. कोणत्या प्रजातीच्या डासांवर हे संशोधन करण्यात आलं? आणि ऐकण्याची क्षमता डासांसाठी इतकी महत्त्वाची का आहे?
रिपोर्ट - मिशेल रॉबर्ट्स
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने (ISRO) भारताचं पहिलं अॅनालॉग स्पेस मिशन (Analog Space Mission) लेहमध्ये सुरू करत असल्याचं जाहीर केलंय.
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या ताज्या ‘मन की बात’मध्ये डिजिटल अरेस्टचा उल्लेख केला. आपण पोलीस वा तपास अधिकारी असल्याचं भासवत एखाद्या व्यक्तीला वेठीला धरून पैसे उकळण्याचा हा प्रकार आहे. डिजीटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय? खरंच पोलीस असं कुणाला डिजिटल अरेस्ट करू शकतात का? फ्रॉडचा हा नवा प्रकार काय आहे? त्यापासून सावध कसं रहायचं? आजची सोपी गोष्ट याचबद्दल.
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
कॉमनवेल्थ ही जगभरातल्या देशांची संघटना आहे ज्यातल्या देशांचा ब्रिटीश साम्राज्याशी ऐतिहासिक संबंध आहे वा होता. युनायटेड किंग्डमसह या कॉमनवेल्थमध्ये 54 देश आहेत.
The podcast currently has 844 episodes available.
7,839 Listeners
58 Listeners
0 Listeners
1 Listeners
5 Listeners