
Sign up to save your podcasts
Or


Axiom 4 मोहिमेअंतर्गत शुभांशु स्पेस स्टेशनमध्ये ISRO साठी सात प्रयोग करत आहेत. भारतातील वेगवेगळ्या संस्थांच्या प्रयोगशाळांनी हे प्रयोग डिझाईन केले आहेत. शुभांशु अंतराळात जातानाच या प्रयोगांसाठी आवश्यक सामुग्री सोबत घेऊन गेले आहेत.अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळपास नसतंच. त्यालाच मायक्रोग्रॅव्हिटी म्हणतात. अशा वातावरणात राहण्याचा मानवी शरीरावर होणारा परिणाम शुभांशु तपासत आहेत.
रिपोर्ट - जान्हवी मुळे
महिन्याभरापूर्वी अमेरिकेतल्या डॉक्टर्सनी जेनेटिक डिसॉर्डर असणाऱ्या एका बाळावर उपचार केले...कसे..तर या बाळाच्या शरीरातला बिघाड असणारा DNA त्यांनी - rewrite केला...एक विशिष्ट Gene Editing Therapy वापरली... जगात पहिल्यांदाच असं झालं... पण याही पुढे जाऊन समजा असा संपूर्ण DNA च निर्माण करता आला तर... म्हणजे कृत्रिमरित्या मानवी आयुष्य तयार करता आलं तर... या वादग्रस्त प्रयोगावर काम सुरू झालंय...काय आहे हा प्रयोग...आणि त्यावरचे आक्षेप काय आहेत.. समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये...
रिपोर्ट : अमृता दुर्वे
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : अरविंद पारेकर
आयकर खात्याने रिटर्न भरण्यासाठीच्या फॉर्म्समध्ये बदल केलेयत. मग कोणता फॉर्म कुणासाठी आहे? तुम्ही कोणता फॉर्म निवडायचा? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये...
रिपोर्ट : अमृता दुर्वे
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : अरविंद पारेकर
वेरा सी रुबिन ऑब्झर्व्हेटरी ही वेधशाळा आहे चिलीमध्ये. आणि ती उभारण्यासाठी अमेरिकेचं नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि अमेरिकेच्या ऊर्जाखात्यासोबतच जगभरातल्या वेगवेगळ्या विज्ञान संस्था, विद्यापीठं आणि दानशूर व्यक्तींनी हातभार लावलाय. वेधशाळेचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी तयार करून नंतर चिलीमध्ये जिथे आता वेधशाळा उभारण्यात आलीय - तिथे आणण्यात आलीय.
काय आहे ही नवी वेधशाळा... आणि विश्वस समजून घेण्यासाठी तिची मदत कशी होणार आहे...
रिपोर्ट : अमृता दुर्वे
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : अरविंद पारेकर
'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमात एका प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता सलमान खानने आपल्याला 'ब्रेन ॲन्यूरिझम' नावाचा आजार असल्याचं सांगितलं आहे. सलमान खानच्या या वक्तव्यानंतर, ब्रेन एन्युरिझमशी लोकांना प्रश्न पडले आहेत. मेंदूतला हा आजार म्हणजे नेमकं काय असतं? ब्रेन ॲन्युरिझम किती गंभीर ठरू शकतो आणि त्यावर उपाय काय आहेत,
लेखन : जान्हवी मुळे
निवेदन : गुलशन वनकर
एडिटिंग : शरद बढे
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,582 Listeners

1,040 Listeners

5,510 Listeners

1,803 Listeners

1,802 Listeners

1,026 Listeners

1,992 Listeners

3,223 Listeners

720 Listeners

1,007 Listeners

1 Listeners