
Sign up to save your podcasts
Or


In this video, we delve into the world of Pandharpur Wari, a centuries-old tradition that has been an integral part of Marathi culture, particularly during ashadhi ekadashi. The wari, which is a pilgrimage to the revered temple of Vitthal in Pandharpur, has been a symbol of devotion and spirituality for millions of followers of sant tukaram and dnyaneshwar mauli. However, beneath the surface of this grand spectacle, lies a complex web of commercial interests and exploitation. We explore the dark side of devotion, where the lines between faith and business are blurred, and the true essence of spirituality is often lost in the chaos of ashadhi wari.
साहित्याचा खप आणि व्यापारी नफा या पलीकडे जाऊन केवळ 'गुणवत्ता' जपणारा प्रकाशक आजच्या काळात शोधून सापडेल का? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच्या विशेष भागात लेखक श्री काका विधाते यांनी प्रफुल्लता प्रकाशनाचे संस्थापक श्री. गुलाबराव सपकाळ यांच्या पंचाहत्तरीनिमित्त लिहिलेल्या हृदयस्पर्शी आठवणींचे अभिवाचन, आधारवड या पुस्तकातून पौर्णिमा देशपांडे यांनी सादर केले आहे. संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व, ४० वर्षांची निष्ठावंत ज्ञानसेवा, संशोधनासाठी खंबीर पाठबळ देणे, व्यवसायापलीकडचे भावबंध, ग्रंथनिष्ठा व औदार्य असे बहुमूल्य गुण आपल्याला सरांमध्ये पहायला मिळतात त्यांची ही सुरस कहाणी नक्की ऐका.
7 ऑक्टोबर 1556 रोजी दिल्लीच्या पुराणा किल्ल्यात हेमूचा 'हेमचंद्र विक्रमादित्य' म्हणून राज्याभिषेक झाला. पृथ्वीराज चौहानांनंतर तब्बल 364 वर्षांनी दिल्लीच्या तख्तावर बसणारा तो पहिला हिंदू होता.
'नेणिवेची अक्षरे' या संग्रहातल्या प्रेम कवितांनाही खास 'संदीप खरे-टच' आहे. कित्येक कविता म्हणजे गझलनुमा नग्मे वाटतात.
Did Delhi really wait until 1947 for an Indian ruler after Prithviraj Chauhan fell in 1192? Meet Hemu (Hemchandra Vikramaditya), the last Hindu emperor of Delhi, who won 22 battles and challenged Akbar’s Mughal empire.
मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (Retd). यांना लष्करातील कामाचा अनुभव तर आहेच शिवाय त्या एक उत्तम लेखिकाही आहेत. त्यांनी लिहीलेल्या "अपराजिता - गाथा भारतीय वीरांगंनांची" - या ग्रंथात, 'शस्त्रे रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते' या उक्तीप्रमाणे, राष्ट्र सुरक्षित ठेवून संस्कृती आणि मंदिरांचा जिर्णोद्धार करणार्या, राघोबा दादांच्या आक्रमणाला हत्तीवर स्वार होऊन प्रत्युत्तर देणाऱ्या आणि मुघल बादशहाच्या हुकूमाला ठामपणे नाकारणाऱ्या अहिल्यादेवीं यांच्या थरारक आणि प्रेरणादायी इतिहासाबद्दल संवाद साधला आहे. नक्की पहा.
आजच्या डिजिटल युगात मुलांचा वाढता स्क्रीन टाईम आणि त्यातून उद्भवणारे दुष्परिणाम ही प्रत्येक पालकाची सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. पण केवळ स्क्रीन हिरावून घेणं हा यावर उपाय नाही! या विशेष पॉडकास्टमध्ये, 'शिक्षण विवेक' मासिकाच्या संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी लहान मुलांचे अनोखे भावविश्व, त्यांच्या विचारांचे लॉजिक आणि त्यांना वाचन-संस्कृतीकडे कसे वळवायचे यावर मोलाचे मार्गदर्शन केले आहे. मुलांची कल्पनाशक्ती कशी वाढवावी, कुटुंब म्हणून एकत्र येऊन स्क्रीन टाईम कसा कमी करावा आणि 'राष्ट्रीय विचार' मुलांपर्यंत कसे पोचवले जात आहेत, या सर्व प्रश्नांची सोपी उत्तरे या भागात मिळतील.
Is your ego or personality defects coming in the way of your success and spiritual growth? In this special unreleased part from the original podcast episode, Tejal Patrikar Tai—Music Coordinator at Maharshi Adhyatma Vishwavidyalaya—guides us on the process of 'Eradication of Personality Defects and Ego'. She explains how subtle, hidden ego in anyone—whether an artist or a professional—causes a person's downfall, and how one can break free from it to achieve inner and outer purity & success
अध्यात्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा किंवा कर्मकांड आहे का? अध्यात्म म्हणजे फक्त वृद्ध लोकांसाठीचा मार्ग किंवा सगळं सोडून संन्यास घेणे असे तुम्हालाही वाटते का? 'ग्रंथप्रेमी पॉडकास्ट'च्या या विशेष भागात 'अमृताचे डोही' YouTube चॅनलच्या संचालिका आणि निरूपणकार संध्या सप्रे यांच्याबरोबर आपण वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता या विषयावर चर्चा केली आहे. वेदान्त विचार आणि ज्ञान आजही कसे relevant आणि उपयोगी आहे हे अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी सांगितले आहे.