Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

By मी PodcasterEducationSelf-Improvement
Download on the App Store

Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट episodes

  • काळानुसार बदलणारी शिक्षिका - EP 38 - Dr Ujjwala Barve

    आपल्यापैकी बऱ्याच लोकांना  दूरदर्शन आणि आकाशवाणी चा काळ आठवत असेल. 


    त्या वेळेस माहिती प्रसारणावर काही मूठभर लोकांचं नियंत्रण असायचं, आधी सरकारचं नंतर काही मोठ्या कॉर्पोरेट news channel चं. 


    इंटरनेट आणि social media ह्या मुळे हे सगळं बदललं. 


    आता प्रत्येकाच्या हातात माहिती प्रसणार आलं आहे. आपण पॉडकास्ट, youtube, blog, फेसबुक पोस्ट, tweet अश्या कुठल्याही माध्यमातून घरी बसून माहिती प्रसारण करू शकतो. 


    पण निर्मिती सगळ्यांना करता येऊ लागली असेल तरी ह्याच्या फायद्यांपेक्षा धोके जास्त असतात, कारण एक fake news जगात कुठेही दंगली सुरु करू शकतात. 


    त्यामुळे निर्मिती करताना त्याच्या बरोबर येणाऱ्या responsibilities  पण आपण जाणून घेतल्या पाहिजे. 


    social media  चे फायदे आणि तोटे ;  इतक्या वर्षात माहित प्रसारणात झालेले बदल ; online education, त्याचे फायदे, तोटे ; पॉडकास्ट चे भविष्य, अश्या  

    अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत डॉ उज्ज्वला बर्वे ह्यांच्याशी. 


    डॉ उज्ज्वला बर्वे ह्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या communication &  Journalism विभागाच्या प्रमुख आहेत, त्यांना विविध माध्यमातून काम करण्याचा अनेक दशकांचा अनुभव आहे, आणि ह्या क्षेत्रातला त्यांचं नावं खूप मोठं आहे.  

     

    त्यांचे स्वतःचे पण दोन पॉडकास्ट आहेत त्याची लिंक खाली दिली आहे


    १) अनुस्वाद ( अनुवादित पुस्तकांवर आधारित पॉडकास्ट ) - https://open.spotify.com/show/1onyyMErK49kPzfHN1rANI?si=OEEApA7hSZqbuwRNNjVeZQ&dl_branch=1


    २) माध्यम संशोधन संवाद  ( communication &  Journalism च्या विद्यार्थ्यांसाठी ) - https://open.spotify.com/show/1WrPHjNF6KgbKaTNdk98E5?si=y4Y4usMTQl2L8llkdBORNg&dl_branch=1


    त्यांनी सांगितलेलं पुस्तक इथे विकत मिळेल - https://amzn.to/3pFIYZx


    आमची website आहे - www.mipodcaster.com 





    55 min
  • आर्थिक घोटाळे शोधणारी फॉरेन्सिक अकाऊंटंट - EP 37 - Dr Apurva Joshi

    आजची आपली पाहुणी आहे अपूर्वा जोशी. 


    अपूर्वा ही एक फोरेन्सिक अकाऊंटंट आहे. 


    तिचं काम आहे समाजातील उचभ्रू, पॉवरफुल, श्रीमंत आणि हुशार अश्या लोकांनी केलेले आर्थिक घोटाळे शोधून काढणे, आणि त्याचे न्यायालयात मांडता येतील असे पुरावे सादर करणे.  


    हे सगळं  netflix वर खूप ग्लॅमरस वाटत असेल, पण खऱ्या आयुष्यात प्रचंड मोठ्या ढिगाऱ्यातून, म्हणजे आता अर्थात डिजिटल ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखं हे काम खूप मेहनतीचं, प्रचंड चिकाटिच आणि अतिशय चौकस बुद्धीच आहे. 


    अश्या ह्या क्षेत्रात एका मुलींनी येणं खुपच प्रेरणादायी आहे. 


    घोटाळे शोधून काढण्याबरोबरच ते होऊच नये ह्या साठी प्रेव्हेंटिव्ह आणि शैक्षणिक कामही अपूर्वा आणि तिची संस्था करते. 


    अश्या क्षेत्रात काम करायचे फायदे , challenges काय ?


    कोणते कौशल्य आणि mindset लागतो ?


    मुलींनी अश्या क्षेत्रात काम करावे का?


    तिच्या कारकिर्दीतल्या इंटरेस्टिंग केसेस बद्दल माहिती 


    अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत डॉ अपूर्वा जोशी हिच्याशी, इन्स्पिरेशन कट्टाच्या ३७व्या भागात. 


    त्यांची website आहे - https://riskprolearning.com/


    त्यांनी suggest केलेला पुस्तकं इथे मिळेल  -  https://amzn.to/3oZClAR ( इंग्लिश )  ; https://amzn.to/3vuOvEv ( मराठी अनुवाद) 


    आमची website आहे - www.mipodcaster.com 





    55 min
  • स्ट्रेस कसा कमी करावा ? EP 36- PRACHI DESHPANDE

    स्ट्रेस म्हणजे ताण प्रत्येकाला असतो. तो दोन प्रकारचे असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक ताण हा आपल्या प्रगती साठी चांगला असतो, तर नकारात्मक ताण आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी वाईट.

    मग हा नकारात्मक ताण कसा कमी करायचं, किन्हां तो यायलाच नको ह्या साठी काय उपाय आहेत.

    आपले विचार, आपलं अन्न ह्या सगळ्याचा आपल्या शरीरातील उर्जानशी काय संबंध असतो.

    रेकी सारख्या तत्वांचा ह्या सगळ्यासाठी कसा उपयोग होतो.

    रेकी मागचं शास्त्र काय आहे?

    अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत, इन्स्पिरेशन कट्टा च्या ह्या 36व्या भागात प्राची देशपांडे ह्यांच्याशी, ज्या एक स्ट्रेस management एक्स्पर्ट आणि रेकी मास्टर आहेत. त्यांनी ह्या विषयांवर अनेक पुस्तकं पण लिहिली आहेत ....


    प्राची देशपांडे ह्यांनी रेकमेंड केलेलं पुस्तक तुम्ही इथे खरेदी करू शकता - https://amzn.to/3f8BbQe

    प्राची देशपांडे ह्यांनी लिहिलेलं पुस्तक इथे विकत मिळेल  - https://amzn.to/3bEwXxJ,  https://amzn.to/3ynnTXP , https://amzn.to/3hJbWWA

    प्राची देशपांडे ह्यांची  website आहे - www.prachideshpande.com 

    आमची website आहे - www.mipodcaster.com 



    48 min
  • Passion ला monitize नक्की करता येतं !- EP 35 - NIKET KARAJAGI

    निकेत करजगी हे एक executive coach आहेत. त्यांनी आता पर्यंत २लाख पेक्षा जास्त लोकांना ट्रैनिंग दिला आहे. २००० तास पेक्षा जास्त कॉन्टेन्ट त्यांच्या कडे तयार आहे. 


    आजच्या ह्या गप्पांमध्ये खूप छान गोष्टी शिकायला मिळाल्या, एक म्हणजे आपला passion area शोधा, तो कसा शोधायचा त्या साठी टिप्स ह्या एपिसोड मध्ये दिल्या आहेत. त्यात काम करा आणि तत्यातून पैसे कमवा. 


    passion कसं शोधावं, आपला वेगळेपणा किती महत्वाचा असतो, आजच्या अनिश्चिततेच्या युगात काय करायला हवं, अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत इन्स्पिरेशन कट्टा च्या ह्या ३५व्या भागात.. 


    आमच्या website www.mipodcaster.com ह्या वर भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 


    You can buy the book recomanded by the guest here - https://amzn.to/3vTrjzo





       

    59 min
  • स्वप्नं बघा, सातत्याने मेहनत करा पण flexible राहा - EP 34 - MADHURA BACHAL
    मधुराज रेसिपी हे नाव youtube वर असण्याऱ्या मराठी माणसांनी ऐकलं नाही ह्याची शक्यता फारच कमी आहे, त्यांच्या यशा मागची गोष्ट पण अनेकांनी ऐकली असेल. आज मधुराजींशी झालेल्या ह्या गप्पान मध्ये एक खूप महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली, त्या म्हणतात, स्वप्न बघा, ते पूर्ण करायला मनापासून प्रयत्न करा, पण फ्लेक्सिबल राहा, रिजिड नको असायला. कधी detour घायची गरज पडली तर तो घ्या. कन्टेन्ट च्या बाबतीत पण फ्लेक्सिबल असायला हवं . उदाहरण  म्हणजे,  त्यांचं vision  आहे पारंपरिक मराठी पदार्थ जगासमोर आणायचे, पण प्रत्येक वेळेस प्रेक्षकांना ते बघायला आवडतील असं नाही, सो कधी मराठी, कधी ज्याला डिमांड आहे अशे पदार्थ त्या टाकून balance maintain  करतात.
    Please visit www.mipodcaster.com and give us your feedback about the podcast.
    38 min
  • Passion ची शोध ही यशाची पहिली पायरी आहे - EP 33 - MAKARAND REGE


    आपलं passion कसं शोधावं ? passion सापडणं हे शेवट आहे की सुरवात ? सतत शिकतं का राहावं ? कोणत्या विषयाचं training घ्यावं ? coach कसा select करावा ? अश्या विषयांवर बोललॊ आहे इन्स्पिरेशन कट्टाच्या ३३व्या भागात मकरंद रेगे ह्यांच्याशी.

    मकरंद रेगे हे सिद्धार्थ लेअर्निंग सिस्टिम चे संस्थापक आहेत आणि २००१ पासून ते ट्रैनिंग आणि कोअचिंग क्षेत्रात काम करतात आहे . मार्शल गोल्डस्मिथ ह्या जगविख्यात coach कडून त्यांनी ट्रैनिंग घेतलं आहे आणि त्यांच्या तत्वावर ते काम करतात. अक्षयपात्रा ह्या जगविख्यात NGO सोबत काम करण्याचा अनुभव पण त्यांच्या पाठीशी आहे.


    त्यांची website आहे - www.makrege.com आहे.

    त्यांनी सांगितलेले पुस्तक - https://amzn.to/3sQNKDq इथे मिळू शकतं

    आमची website आहे www.mipodcaster.com ह्या वर भेट देऊन प्रतिक्रिया नक्की कळवा.

    How to find your passion? Is finding passion the ultimate thing? Why to keep yourself updated with the latest knowledge ? How to choose a training program? How to choose a coach? spoke to these and other topics on the 33rd episode of Marathi podcast Inspiration Katta with  Makarand Rege.

    Makarand Rege is the founder of Siddharth Learning Systems. He has been in the training and coaching field since 2001. He is coached by Marshall Goldsmith. He also has amazing experience of working with world class NGO Akshaya Patra. 

    His website is www.makrege.com

    Book suggested by him can be bought - https://amzn.to/3sQNKDq

    Our website - www.mipodcaster.com, please visit and give your feedback.

    51 min
  • अपयशाची भीती काढून टाका - EP -32 - SAMEER DHAMANGAONKAR

    उद्योजक आणि व्यावसायिक ह्यात फरक आहे.


    समाजाला कशाची गरज आहे हे शोधणे, त्या साठी एखाद्या गोष्टीची मागणी नसेल तरी एखादी वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देणे,
    त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता तयार करणे, त्यातून त्या वस्तू/सेवा ह्यासाठी मागणी तयार करणे. हे सगळं उद्योजक करत असतात.

    आपल्या देशात व्यावसायिक असतात पण उद्योजक नसतात असा साधणार चित्र दिसतं.

    समीर आणि त्याच्या टीम ने मराठी पुस्तकं श्राव्य माध्यमांत आणण्याचे काम त्याची ट्रेंड नसतानाही २०११ मध्ये सुरु केलं.

    हळू हळू snovel ह्या भारतीय श्राव्य माध्यमाची सुरवात झाली आणि आता ते आपल्या कक्षा उंचावण्याच्या तयारीत आहेत.

    snovel ची सुरवात, सुरवातीच्या दिवसात आलेल्या अडचणी, श्राव्य माध्यम, content creation, त्याचं भविष्य ह्या सगळ्यवार गप्पा मारल्या आहेत
    समीर धामणगावकर ह्याच्याशी आपल्या ३२व्या भागात.


    There is a difference  between an entrepreneur and a businessman.

    An entrepreneur is the one who finds out exactly what is needed in the market, creates a product or service to serve that need,  creates awareness about it and generates demand for the product and service.

    In India entrepreneurship is not that common.

    Sameer and his team started creating audio content in 2011 when there was not trend of audio content. Slowly Snovel was formed and now they are ready to change the orbits and go to the next level.

    Spoke to Sameer Dhamangaonkar on How Snovel started, difficulties faced, challenges, future plans, content creation industry, scope in content creation and much more on 32nd episode of Inspiration Katta.

    1 hr 12 min
  • यशस्वी YOUTUBER बनण्याचा प्रवास - EP 31 URMILA NIMBALKAR

    भारतात साधारण 30 कोटी लोकं youtube बघतात.. म्हणजे अमेरिकेच्या जवळजवळ संपूर्ण लोकसंख्येच्या बरोबरीचे youtube बघणारे लोक भारतात आहेत.. आणि jio आल्यावर ही संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे..

    मग एवढे लोक जिथे असतात तिथे त्याची स्वतंत्र economy तयार होणं हे स्वाभाविक आहे..

    पण ही स्वतंत्र economy जरी असली आणि खूप fame आणि पैसे कमावण्याची इथे संधी असली तरी, ते अगदी झटपट कमावता येतात अशी अनेक लोकांची धारणा झाली आहे..

    मग नक्की तथ्य काय आहे?  खरच इतका scope इथे आहे का? त्या साठी काय करावं लागतं? सातत्याने कामं करण किती महत्त्वाचे असतं? Patiance किती आवश्यक आहे? ह्या आणि अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत अभिनेत्री ते youtube star असा प्रवास करणाऱ्या उर्मिला निंबाळकर हिच्याशी इन्स्पिरेशन कट्टा च्या 31व्या भागात

    1 hr 29 min
  • Career growth साठी calculated risk जरूर घ्या - EP 30- HEMANT DESHPANDE

    करिअर मध्ये अडकल्या सारखं वाटतं आहे का ? काहीतरी नवीन करावंसं वाटतं आहे का ? काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे का ?


    असेल तर हा एपिसोड नक्की ऐका, कारण तुमच्या प्रश्नांचं उत्तर कदाचित career coach हेमंत देशपांडे ह्यांच्याशी केलेल्या ह्या गप्पांमध्ये मिळू शकेल.

    www.HemantDeshpande.com

    Phone: 7888070309
    LinkedIn: https://www.linkedin.com/in/hemantlifecoach/

    1 hr 32 min
  • Digital च्या युगात लहान मुलांसाठी छापील मासिक यशस्वी पणे चालवणारी - EP 29 - AMRUTA KAWANKAR

    आजच्या युगात जिथे प्रत्येक गोष्ट डिजिटल होते आहे, तिथे लहान मुलांनसाठी प्रिंटेड मासिक काढणं ते पण इंग्रजी माध्यमाच्या युगात मराठीतून , आणि हा उपक्रम खूप यशस्वी करण आणि प्रिंटेड आणि मराठीतून असूनही मुलांना तो प्रचंड आवडणं हे खरोखर विलक्षण आहे..

    तुम्ही चिकुपिकू हे नाव ऐकल आहे का? ऐकलं असेल तर त्या मागची ताई अमृता कावंणकर हिने चिकुपिकू ची सुरवात कशी केली, संकल्पना कशी सुचली, लोक कशे जुडत गेले, मासिक काढ्याण्याची प्रोसेस काय असते? पुढचे प्लॅन्स काय? अश्या अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत inspiration katta च्या 29व्या भागात

    1 hr 6 min

About Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

From the publisher's feed

A Marathi podcast for personal development journey.

More shows like Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast) by NACHIKET KSHIRE & LEENA PARANJPE

Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

0 Listeners

Inspiration Chaupal : Hindi Podcast by मी Podcaster

Inspiration Chaupal : Hindi Podcast

0 Listeners