Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

By मी PodcasterEducationSelf-Improvement
Download on the App Store

Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट episodes

  • Meditation का करावे ? - EP 28 - Dr YASH VELANKAR

    मनात सतत विचार चालू असतात, असे विचार येणं चांगलं की वाईट, विचारांना नियंत्रित करू शकतो का?

    स्वभाव बदलू शकतो का?

    ध्यान ( meditation ) म्हणजे नेमकं काय?

    ध्यानाचे प्रकार कोणते?

    ध्यानामुळे नेमकं काय होत?

    कोणी कोणत्या प्रकारचं ध्यान करावं, त्या साठी प्रशिक्षण किंवा दीक्षा घ्यावी लागते का?

    आपल्या मेंदूची संरचना कशी असते?

    Mindfulness म्हणजे नेमकं काय?

    हे व असे अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली आहे इन्स्पिशन कट्टा च्या 28व्या भागात डॉ यश वेलणकर ह्यांच्याकडून,

    त्याचं बरोबर त्यांच्या स्वतःचे अनुभव आणि त्यांतून मेंदूच्या अभ्यासाकडे ते कशे वळले ह्याच्या बद्दलही नक्की ऐकाव्या अश्या गप्पा केल्या आहेत आम्ही..

    So नक्की ऐका आणि इतरांनाही फॉरवर्ड करा

    1 hr 10 min
  • १९व्या वर्षी सात लेकरांचा बाप बनला - EP 27 - SANTOSH GARJE

    वयाच्या एकोणिसाव्या वर्षी आपण काय करत होतो? कदाचीत कॉलेज मध्ये मजा.. संतोष गर्जे ह्या बीड जिल्ह्यातील गेवराई मधल्या तरुणाने, घरातली परिस्थिती अतिशय बिकट असताना वयाच्या 19व्या वर्षी अनाथालय काढलं आणि 7 मुलांचा पालक बनाला..

    सुरवातीला पैश्याची अतिशय टंचाई होती आणि मुलांना दोन वेळचं जेवयालाही मिळत नव्हतं.. संतोष घरोघरी फिरून काय मिळतं आहे का ते पाहिचा.. 7 वर्ष हा संघर्ष चालू होता..

    नंतर हळूहळू दिवस पालटले, आणि डॉ अविनाश सावजी, ह्यांच्या पाठोपाठ अनेक दिग्गज लोकांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन संतोषला लाभले, आणि आज त्यांच्या बालग्राम मधेन 125 पेक्षा जास्त मुलं आनंदाने राहतात आहे...

    देवदूता पेक्षा कमी नसलेल्या ह्या विलक्षण माणसाशी गप्पा केल्या आहेत inspiration katta च्या 27व्या भागात....


    WEBSITE OF BALGRAM/ SAHARA ANANTHASHRAM PARIVAR -   www.aaifoundation.org 

    1 hr 9 min
  • Rags to Riches - EP 26 - RAHUL NARVEKAR

    आपण सिनेमा आणि पुस्तकांमधून अनेक rags to riches गोष्टी ऐकतो / वाचतो, राहुल नार्वेकर हे ह्याचं जिवंत उदाहरणं आहे. 

    मुंबईच्या चाळीतलं जीवन, तिथे केलेली मजा, वाचनाची लागलेली आवड, त्यामुळे जीवनात झालेला फरक, वॉर्ड बॉय ची नौकरी, ट्रक धुऊन कमावलेले दोन रुपये.

    दिल्ली ला जाणे, योग्य वेळी योग्य ठिकाणी असल्यामुळे झालेली प्रगती, ahead of its time  e-commerce मध्ये प्रवेश, अनेक व्यवसाय करणे,  त्यातून शिकणे आणि इतर लोकांना शिकवणे, India netwoks, India Angel Fund.. या व अश्या अनेक विषयावर गप्पा केल्या आहे आहेत ह्या भागात राहुल नार्वेकर ह्यांच्याशी...  

     


    56 min
  • २०२०- करोना - लॉकडाऊन ह्यातून आपण काय शिकलो - EP - 25

    मित्रानो हा आपला पंचेविसावा एपिसोड आहे.. 


    हे वर्ष अगदी वेगळं आणि विचित्र होतं पण नक्कीच आपल्याला अनेक गोष्टी शिकवून गेलं. 

    काय शिकवलं ? ऐकुया आपल्या आजपर्यंतच्या सगळ्या पाहुण्यांकडून .. 

    51 min
  • शारिरीक, मानसिक स्वाथ्यासाठी Mindful Eating आवश्यक आहे - EP 24 - AVANTI DAMLE

    वजन कमी करण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च करू शकता ?


    आजकाल वजन कमी करायला अनेक डाएट प्लॅन्स खूप महागात विकल्या जातात. पण अवंती दामले ह्यांच्या सारखे आहारतज्ज्ञ अजूनही आपल्या समाजात आहेत ज्यांचं म्हणणं आहे कि वजन काटयाचे गुलाम होऊ नका, स्वस्थ आणि निरोगी राहा, आणि ते राहण्यासाठी फक्त घराचं, स्थानिक, पारंपरिक अन्न खा आणि ते खाताना पंचेंद्रियांचा वापर करा, ह्याला ती midful eating असं म्हणते.

    Mindful eating म्हणजे नक्की काय, धावपळीच्या आयुष्यात सकस आहार कसा घ्यावा, आपल्या परंपरा पुढच्या पिढीला कश्या समजतील , घरातल्या बाईने स्वतःच्या आहाराकडे लक्ष दिलं तर कसं सगळं कुटुंब स्वस्थ आणि निरोगी राहू शकेल ह्या आणि अनेक गोष्टींवर गप्पा केल्या आहेत अवंती दामले हिच्याशी.

    52 min
  • रुग्ण हा शेतीत तयार होतो, EP - 23 - DR HEMANGI JAMBHEKAR

    खरं तर हा एपिसोड यायला ही सगळ्यात उत्तम वेळ आहे, कारण सध्या देशात शेतकरी आंदोलन पेटलं आहे..समस्या भरपूर आहेत पण त्याचं निदान शोधणारे कमी लोकं असतात. शेतीतील काही समस्यांचे निदान शोधण्यासाठी हेमांगी जांभेकर ह्यांनी अथक प्रयत्न केले आहेत.. ह्या प्रयत्नांचे फलित म्हणून त्यांनी काही क्रांतिकारी उत्पादनं बनवली आहेत, अशी उत्पादनं जी ग्रामीण भारताचा कायापालट करु शकतील. इतके उपयोगी आणि महत्त्वाचे संशोधन करणारी व्यक्ती किती down to earth असु शकते ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉ हेमांगी जांभेकर आहेत, ह्याच बरोबर The Secret आणि  Law of attraction सारख्या गाजलेल्या पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत.. त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत Inspiration katta च्या 23व्या एपिसोड मध्ये...

    1 hr 5 min
  • मोठे स्वप्न बघा आणि ते पूर्ण करायला सातत्याने परिश्रम करा - EP 22 - ANIMA PATIL SABLE

    Story of a girl from a small town of Jalgaon to working for NASA.


    अगदी लहानपणी अंतराळवीर होण्याचा स्वप्न एक मुलगी बघते, त्या कसं पूर्ण करायचं ह्याच मार्गदर्शन करायला कोणी नसताना पुढे जाते.

    पुढे अनेक अडचणी येतात, निराशा येतात, पण ती पुढे जात राहते. मग लग्न होतं, एक मुलं होतं तरी ती थांबत नाही आणि प्रयत्न करत राहते.

    निवळ्ळ अशक्य अश्या स्वप्नाचा पाठलाग करणं म्हणजे काय आणि त्यासाठी काय परिश्रम लागतात, चिकाटी लागते, त्याग द्यावे लागतात ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे अनिमा पाटील साबळे.

    पण अशे स्वप्न बघितल्याने, वेड लागल्यानेच इतिहास घडतो. तिला मार्गदर्शन मिळालं नाही म्हणून तिला हा प्रवास सुरु करायला उशीर झाला, असं इतर कोणाबरोबर होऊ नये म्हणून ती तरुणांना social media  माध्यमांतून सतत मार्गदर्शन करत असते.   

    आजकाल करिअर करायचं तर लग्नं नको, मुलं तर अजिबातच नको अस तरुणाचा समज आहे, पण ह्या बद्दल NASA मध्ये पूर्ण वेळ काम करणारी, २ teenage मुलं सांभाळणारी आई, आणि घर सांभाळणारी पत्नी तरीही अंतराळवीर बनण्यासाठी ट्रैनिंग घेणारी scientist  astronaut  candidate असं सगळं असणारी, काय म्हणते हे ऐकण्याजोगं आहे..

    चला तर मग गप्पा मारुयात अनिमा पाटील साबळे हिच्याशी
    tist astronaut candidate

    1 hr 28 min
  • संस्कार आणि मूल्य देता येत नाहीत, ती बघून घेतल्या जातात- EP 21- RENU DANDEKAR
    रेणू आणि राजा दांडेकर ह्या दोघांनी शून्यातून विश्व निर्माण होऊ शकतं हे अगदी सिद्ध करून दाखवलं आहे. ह्या उच्च शिक्षित शहरी जोडप्याने चिखलगाव ह्या कोकणातल्या अगदी छोट्या खेड्यात जाऊन जिथे वीज नाही रस्ते नाही अश्या ठिकाणी शाळा सुरु केली.  एका गोठ्यांतून सुरू झालेली शाळा आज मोठ्या शिक्षण संस्थे पर्यंत मोठी झाली आहे. अगदी वेगळ्यप्रकारचे शिक्षण मुलं इथे घेतात.  रेणू दांडेकर ह्याच्या इन्स्पिशन कट्टा च्या 21व्या भागात गप्पा केल्या आहेत..
    रेणू दांडेकर ह्याच्या कामासाठी अजून जाणून घेण्यासाठी https://loksadhana.org/ ह्या website ला भेट द्या. 
    इन्स्पिरेशन कट्टा च्या श्रोत्यांना विठ्ठल माने ह्यांनी लिहिलेला you are ७ stpes closer to your success हे पुस्तक निशुल्क मिळवण्यासाठी https://vitthal.co/katta ह्या लिंक वर क्लिक करून आपली माहिती द्यावी.
    52 min
  • Hello SEXuality - EP 20 - DR PRASANNA GADRE
    तुम्हाला तुमच्या पाल्यांनि कधी पाळी म्हणजे काय, मी कुठून आलो, सेक्स म्हणजे काय अशे अवघड प्रश्न विचारले आहेत का ? अशे अवघड प्रश्न अवघड ठिकाणी तिर्हाहीक लोकांसमोर विचारले गेले आहेत का ?  तुमचं त्यावरचं reaction  काय होतं ?
    पालकांचं आणि पाल्याचं लैंगिक शिक्षण, एकविसाव्या शतकातले लैंगिक विकार, समलैंगिकता, स्त्रियांचे प्रॉब्लेम्स, प्रवाहाच्या विरोधात जाताना येणाऱ्या अडचणी अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत डॉक्टर प्रसन्न गद्रे ह्यांच्याशी 
    डॉ गद्रेचें इतर व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांच्या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या.. https://youtube.com/channel/UClZ9jzQF6ZH4YF2RTPCYS_g
    1 hr 18 min
  • संधी हाक मारते तेम्हा प्रतिसाद नक्की द्या - EP 19 - VIDULA TOKEKAR

    वयाच्या कुठल्याही वर्षी आपल्या आवडीच्या क्षेत्रात व्यवसाय सुरु करता येतो ह्याचा उत्तम उदाहरण म्हणजे विदुला टोकेकर.

    A highly creative person with an eye for details and strong process approach.

    Taking 'book translation' to a different dimension. Leads a team of gifted translation. Strongly believes in 'Do the New'.

    Vidula is a voracious reader and language enthusiast. She has published translation of 15 titles with various publishers and on various subjects ranging from fiction to management to biographies. Her columns in Marathi newspapers and magazines on creativity, leadership and woman entrepreneurship are well received. She worked in industry in finance domain for 15 years, and later in a Chamber of Commerce for 10 years. She left as the director of Chamber of Commerce to start her own venture.

    Her love of books and literature translated into TranslationPanacea. With her outstanding team of translators and editors, backed by her strong process expertise, TranslationPanacea delivers quality translations of titles to publishers in print ready copy. TranslationPanacea also helps corporate to reach to their customers and employees speaking different languages.

    Vidula is an avid traveler, foodie, writer, music lover and likes to dabble with origami.


    45 min

About Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

From the publisher's feed

A Marathi podcast for personal development journey.

More shows like Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast) by NACHIKET KSHIRE & LEENA PARANJPE

Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

0 Listeners

Inspiration Chaupal : Hindi Podcast by मी Podcaster

Inspiration Chaupal : Hindi Podcast

0 Listeners