आपण हे सत्य कधीच नाकारू शकत नाही आणि ह्या सत्याची आपण पदोपदी, अगदी दररोज आठवण ठेवलीच पाहिजे. जेणेकरून आपल्या हातात असलेल्या वेळेचा आपण आदर करायला शिकू.
मला कित्येक वर्षांपासून पडलेला एक प्रश्न. की मी लूजर आहे का? ह्या एपीसोडमध्ये हेच एकमेव उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला ह्या प्रयत्नांचा नक्कीच फ़ायदा होईल.
काही लोकांना वाटेल खुप उशिर झालाय. But it's better late than never. मला तरी नक्कीच असं वाटतयं की अजूनही पुष्कळ आयुष्य जगायचं बाकी आहे आणि त्यासाठी ह्या ikigai चा खुप उपयोग होणार आहे.
आपण अगदी दररोज न चुकता, न थकता किती वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी करतो याचा कधी तरी नक्की विचार व्हायला पाहिजे. हा एपीसोड ऐकून तुम्ही तो करावा, तुम्ही तो करालच !
आयुष्यात आपण साहसी, धाडसी असावं का ? मी तर म्हणीन, असायलाच हवं !! साहसी वृत्ती आपल्याला खूप काही शिकवून जाते. मी "साहस" हा शब्द ह्या एपिसोडमध्ये खूप वेळा वापरलाय त्या बद्दल क्षमस्व.
तुम्ही जरी त्रासात असाल, तरीही हसतमुख राहण्याचा प्रयत्न करा. त्याचा तुम्हाला नक्कीच फ़ायदा होईल. आयुष्यात सकारात्मक बदल घडायला सुरवात होईल.
9 min
About जरा चुकीचे जरा बरोबर!
From the publisher's feed
आपलं आयुष्य कधी "जरा चुकीचे" तर कधी "जरा बरोबर" असतं.
मीही आजवर खूप चुका केल्या आहेत आणि आता त्या सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे.
हे पॉडकास्ट म्हणजे , रोजच्या आयुष्यातला ,छोट्या छोट्या गोष्टींमुळे येणारा stress कायमचा संपवून आपलं आयुष्य आनंदी , समाधानी आणि समृद्धं बनवायचा एक प्रामाणिक प्रयत्न.