माध्यम संशोधन का करायचे, त्यातून काय साध्य होते, ज्ञाननिर्मिती होते का, आणि होत असली तर कशी हे एकदा समजून घेतले की पुढची प्रक्रिया सोपी होते. माध्यम संशोधन करायचे म्हणजे नेमके करायचे हेही कळले पाहिजे. त्यात किती असंख्य पर्याय उपलब्ध आहेत ते माहीत असले पाहिजे. त्या सगळ्यांची उत्तरे या भागात मिळतील.
त्यात सांगितल्याप्रमाणे https://shodhganga.inflibnet.ac.in/ या संकेतस्थळावर भारतात झालेल्या पीएचडी संशोधनविषयांची यादी, आणि पूर्ण प्रबध उपलब्ध आहेत. त्यावर journalism, mass communication, social media, advertising, newspapers, TV असे विविध कळीचे शब्द वापरून तुम्ही माध्यमांशी संबंधित झालेली संशोधने पाहू शकता.