योग्य नियोजन नसेल तर कोणतेही काम अयशस्वी होण्याची शक्यता वाढते. संशोधनप्रक्रियेच्या बाबतीत तर ते अगदीच खरे आहे. संशोधन ही विचारपूर्वक, शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याची गोष्ट असल्याने त्यातील प्रत्येक बाबीचा सांगोपांग विचार होणे आवश्यक आहे. आधी वाचलेले संशोधन अहवाल आणि संशोधनपद्धती, नमुना निवड पद्धती, अभ्यासविषय यांचे ज्ञान यांच्या आधारे संशोधनाची आखणी करणे आवश्यक असते. ही आखणी करणे म्हणजेच संशोधनाचा आराखडा तयार करणे. तो का करावा, कसा करावा, कोणकोणत्या मुद्द्यांचा त्यात विचार करवा या प्रश्नांची उत्तरे या भागात मिळतील.