महर्षी पतंजलींचा अष्टांगयोग मानवाच्या श्वासावर आधारित योगासने सांगतो. तुमचा श्वास हा तुम्हाला सुदृढ बनवण्याचे काम करत असतो. श्वास तुम्हाला जगण्याचे बळ देतो. तुमच्यातील आंतरिक शक्ती, तुमच्यातील क्षमता, आजमावत असतो. अनेकांना असे वाटत असते की, योगासने किंवा प्राणायामामुळे आपल्या मन आणि बुद्धी वर काही चांगले परिणाम होत नाहीत, परंतु हा तुमचा गैरसमज आहे. मी माझ्या अनुभवातून योगासने आणि प्राणायामामुळे माझ्या शरीरावर खूप सकारात्मक परिणाम झालेले मी अनुभवलेले आहे. तुम्हाला जर धावताना थकवा जाणवत असेल, धाप लागत असेल, तर खालील ५ प्राणायाम तुम्ही नक्कीच दररोज केलेच पाहिजेत जेणेकरून तुमची आंतरिक शक्ती वाढविण्यास खूप मदत होईल. खेळाच्या स्पर्धाच्या वेळेस अशाच समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागत असेल, तर नक्कीच माझा हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच.