गेल्या काही आठवड्यात आम्ही एक प्रयोग म्हणून एकत्र आलो आणि आपल्या आवडीच्या विषयावर गप्पा मारल्या. गप्पा कुठल्या विषयांवर? तर ... कुठल्याही ... एखादं वाचलेलं पुस्तक, पाहिलेली डॉक्युमेंटरी, सध्याच्या घडामोडी यामधलं जे समजलं, जसं समजलं, जेवढं समजलं त्यावर. बरेचसे विषय चाळून झाले. अजूनही खूप विषयांमध्ये हात घालता येईल.
पण मग हा उपद्व्याप कशाला?
तर एक तर मेरी आवाज सुनो ही खाज भागवायला, नवीन काहीतरी शिकायला, आणि समविचारी लोकांपर्यंत पोचायला आणि पोचवायला. आता आम्ही तर यातल्या सगळ्याच किंवा कुठल्याही विषयांमध्ये पारंगत असूच असं नाही. पण तुम्ही असूच शकता. तेव्हा, अजिबात न लाजता, ताबडतोब प्रतिक्रिया मात्र कळवत राहा.
तुमच्या माहितीचे कोणी असतील, ज्यांना अशा गप्पा ऐकायला आवडतील, हे त्यांनाही पाठवा. बाकी नेहमीचं ड्रिल, तुम्हालाही माहिती आहेच की. तर ते सगळं लाईक शेअर आणि सबस्क्राईब वगैरे करा.
तर आता मग या सगळ्या विषयांची, विचारांची, जी सरमिसळ होणार आहे, ते हे मेतकूट, तुमच्यापर्यंत पोचवायचा हा छोटा प्रयत्न. डिलिव्हरी चार्जेस शून्य.
प्रतिक्रियेसाठी [email protected]