
Sign up to save your podcasts
Or


शिकण्यासाठी आता इतक्या गोष्टी उपलब्ध आहेत, की काय सांगा? पण तरीसुद्धा सगळ्यांना सगळंच जमतंय असंही होत नाही न? मग शिकायचं कसं यातसुद्धा काहीतरी कलाकारी असेल काय? आजच्या गप्पा या विषयावर. तुम्ही कसं शिकता नव्या गोष्टी? तेही जरूर सांगा.
वटवटकार: पराग, सागर आणि रोहित
प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
जगभर कित्येक हजार भाषा आहेत. या भाषांमध्ये शब्दांची देवाण घेवाण सुरुच असते. हे पूर्वापार सुरु आहे. पण त्याच बरोबर प्रत्येक भाषा त्या त्या ठिकाणाचा थोडाफार इतिहास, भूगोल, संस्कृती सुद्धा जपते. मग या पार्श्वभूमीवर थोडीशी चर्चा शुद्ध भाषा, आणि त्याचा भाषाशुद्धीच्या आग्रह यावर चर्चा.
वटवटकार: पराग, सागर आणि रोहित
प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
या भागात आलेले संदर्भ:
यु.म. पठाण यांचे फारसी-मराठी अनुबंध पुस्तक
How language shapes the way we think | Lera Boroditsky
BBC Article: https://www.bbc.com/marathi/india-511...
काय शिकावं? कसं शिकावं? शिकलं ते वापरलं जातं का? वगैरे वगैरे प्रश्न आपल्या माहितीचेच. शाळा कॉलेज चा प्रवेश जवळ आला असेल तर हे सगळं अजूनच जास्ती जवळचं. आम्ही पॉडकास्टच्या आजच्या भागामध्ये या सगळ्या बाजू हाताळायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुमच्या काय आठवणी आहेत?
वटवटकार: पराग, सागर आणि रोहित
प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
कोरोनाव्हायरसमुळे जगभर आलेल्या महामारीतून मार्ग काढण्यासाठी, खूप लोकांनी, संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. जशा जमेल त्या पद्धतीने लोक एकत्र आले, आणि त्यांनी हे शक्य करून दाखवलं. हा प्रवास अजून संपलेला नाही. पण तरीही आता शेवट दृष्टीक्षेपात येतोय असं वाटतंय.
यामध्ये, पैसे उभं करण्याचं काम, मदत पोचवण्याचं काम सागरने बघितलं. स्वतः जबाबदारी उचलली. तर या भागामध्ये त्याच्याकडून त्याचा अनुभव ऐकुया.
वटवटकार: पराग, सागर आणि रोहित
प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
#fundraising #covid #maharashtra #relief
"सोशल डिलेमा" डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर जे विचारचक्र सुरु झालं त्यावर मारलेल्या ह्या गप्पा. काय बरं आहे हा विषय? खरंच घाबरण्या सारखं आहे का? की अजून थोडी माहिती काढली पाहिजे? असं सगळं...
वटवटकार: पराग, सागर आणि रोहित
प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
गप्पांमध्ये आलेले काही संदर्भ :
1. The Social Dilemma (Netflix Documentary)
समानता हा खूप गंभीर विषय आहे. कित्येक वर्षांनुवर्षे हा वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या समोर येताच राहिलाय. याच बद्दल आज आम्ही थोडीशी चर्चा केली. एकमेकांची मतं जाणून घेतली. बघा तुम्हाला काय वाटतंय?
वटवटकार: पराग, सागर आणि रोहित
प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
टोकाच्या भूमिका, त्याची सध्याच्या काळातली उदाहरणं आणि आमच्या परीनं केलेलं विश्लेषण. खरंच हे खूप वाढलंय का? कितपत धोका आहे याचा? याचं काही करता येऊ शकतं का? हे असं बरंच काही.
गप्पांमध्ये आलेले संदर्भ
वटवटकार: पराग, सागर आणि रोहित
प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
आपल्या मानाचं प्रकरण जेवढं खोलात शिरावं तसं प्रत्येकाचं एकसारखंच तरीही वेगवेगळं. या मनाला समजून घेण्याचे, थोडं नियंत्रित करायचे प्रचलित मार्ग कोणते? आपल्याला कोणते जमतात? या मनाचा किंवा मेंदूचा आभ्यास कोणी केलाय का? वगैरे वगैरे
वटवटकार: पराग, सागर आणि रोहित
प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
गप्पांमधले आलेले काही संदर्भ
दर शनिवारी एकत्र येऊन गप्पा मारू असं ठरवल्यानंतरचा हा पहिला भाग. यामध्ये सागरने त्याचा डायबेटीस बद्दलचा त्याचा अनुभव आणि त्याच्याशी निगडित समज आणि गैरसमज सांगितलेत. परागने सेपियन्स पुस्तकाबद्दल चर्चा केलीय तर रोहितने जेनेटिक्स मध्ये काय बघितलं ते सांगितलय.
वटवटकार: पराग, सागर आणि रोहित
प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email
#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट
गेले काही महीने मी आणि माझे दोन मित्र- सागर आणि रोहीत - आम्ही एक प्रयोग करून बघितला.दर शनिवारी एका ठरावीक वेळी एकत्र येऊन ऑनलाईन गप्पा मारल्या.
विषय कोणते? तर एखादे चांगले पुस्तक, बघितलेला सिनेमा/डॉक्युमेंटरी किंवा आवडीचा वाटेल, समजावुन घ्यावा वाटेल असा एखादा विषय.
खरं तर यात बोलताना जेवढी मजा आली त्यापेक्षाही खूप जास्त मजा ऐकण्यात आली. अनेक नवीन पुस्तके, नवीन विषय, काही interesting लोकं यांचे references मिळाले आणि एका विषयाकडे किती वेगवेगळ्या दृष्टिकोणातून पाहता येते याचीही जाणीव झाली.
विषयांची, विचारांची, माहितीची अणि दृष्टीकोणांची ही साधी, सोपी सरमिसळ म्हणजे हे जमलेले मेतकूट!
बघा तुम्हालाही हे सकस आणि पौष्टिक वाटतय का?
पण प्रतिक्रिया मात्र जरूर कळवत राहा म्हणजे हा प्रयोगात आम्हाला अजून सुधारणा करता येतील. प्रतिक्रिया थेट मला सांगू शकता, किंवा [email protected] इथे कळवू शकता.
तेव्हा आता दर आठवड्यात भेटत राहूच.
पराग
From the publisher's feed