भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुन्हा एका चांद्र मोहिमेसाठी सज्ज आहे. चंद्रयान-3 ही भारताची आजवरची सर्वांत किचकट आणि सर्वांत महत्त्वाची अंतराळ मोहीम मानली जातेय.
हे यान अवकाशात उड्डाण केल्यावर चंद्रावर पोहोचायला 40 दिवस लागतील.
पण याआधी 1969 साली मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं, तेव्हा नासाच्या अपोलो 11 यानाने चंद्रापर्यंतचा प्रवास अवघ्या 4 दिवसात पूर्ण केला होता. मग चंद्रयानला पृथ्वीच्या उपग्रहापर्यंत पोहोचण्यासाठी एवढा वेळ का लागतो आहे?
जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन – श्रीकांत बक्षी, बीबीसी तेलुगू
लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर